व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५५५
and there were branches in Bombay and Poona.” तर गवई यांच्या चरित्रात श्री. ना. रा. शेंडे म्हणतात, “ १९१८ साली ' डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन ' म्हणजे ' बहिष्कृत भारत समाज ' ही संस्था नागपूर येथे प्रातिनिधिक स्वरुपात स्थापन झाली, त्यावेळी नानासाहेब गवई, हे संस्थेचे सूत्रचालक होते. या संस्थेची पहिली कार्यकारी शाखा ता. १२ जानेवारी १९१८ रोजी धोबी तलाव, मुंबई येथे कै. रामजी लक्ष्मण सांगवकर यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात
आली.... ... सन १९२५ ते १९२७ सालचे दरम्यान मुंबईचे माजी मुख्यमंत्री
कै. बाळासाहेब खेर, सर चिमनलाल सेटलवाड, सर पुरुषोत्तमदास ठाकोरदास, बॅ. जहांगीर वगैरे थोर गृहस्थ या संस्थेला अध्यक्ष लाभले होते.” (ग. आ. गवई : व्यक्ति आणि कार्य, लेखक--ना. रा. शेंडे, पा. ४६).
“ विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास ' या पुस्तकाचे कर्ते श्री. हि. ल. कोसारे पुढील माहिती देतात. 'डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन ' अर्थात “बहिष्कृत भारत समाज ' ही संस्था नागपुरला १९२२ साली स्थापन करण्यात आली. ह्या संस्थेचे प्रेसिडेंट जॉर्ज पी. डिक, सी. आय. ई. एम. एल. सी ; व्हाईस प्रेसिडेंट केशवराव जाणुजी खंडारे, सेक्रेटरी गणेश आकाजी गवई, एम. एल. सी. आणि सदस्य अँड. सी. बी. पारेख, एम. एल. सी., पी. एन. भटकर, रामचंद्र डोमाजी वासनिक, किसन फागुजी बंदसोडे, दामोदर मुरारी खापर्डे, विठोबा चिंधुजी फुलमाळी, लक्ष्मण श्रावण भटकर, अंतुजी नाभाजी मडकवारे हे
होते. (पा. ११५, १२२).
तेलंग, न्या. काशिनाथ त्र्यंबक (१८५०-१८९३) :--संस्कृतादि आर्य व कन्नड भाषा, वैदिक, जैन व बौद्ध तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक व संशोधक. मुंबई येथे हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून महत्त्वाचे कार्य केले. १८८५ साली स्थापन झालेल्या इंडियन काँग्रेसच्या स्थापनेमध्ये वाटा. १८८५ ते १८८९ पर्यंत काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून काम केले. शास्त्र व रूढी यांच्या “बलाबलाविषयी विचार” व “सामाजिक विषयासंबंधी तडजोड “ हे निबंध प्रसिद्ध आहेत. इ. स. १८८९ साली झालेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
दाते, शंकर रामचन्द्र (१८९८) :--लोकसंग्रह दैनिकात संपादकीय विभागात लेखन. मुद्रण कलेत मूलगामी संशोधन. मोनो टाईप यंत्रावर देवनागरी लिपी बसविली. १९२४-३० च्या कालावधीत पुणे हिंदुसभेचे कार्यवाह, नंतर महाराष्ट्र हिंदुसभेचे व त्यानंतर अखिल भारतीय हिंदुसभेचे कार्यवाह, नंतर अखिल भारतीय हिंदुसभेचे उपाध्यक्ष, १९४०-५५ मध्ये दैनिक काळचे संपादक. 'महाराष्ट्र हिंदुसभेच्या कार्याचा इतिहास “ लिहून काढला आहे.