व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५५७
दिवाणात शाबीत करावयाचा रिवाज असे. भारत -इतिहास-मंडळाचे सप्तम-संमेलन वृत्त पान ५४ वर संशोधक शंकर ना. जोशी वाईकर ह्यांनी पुढील महत्त्वाच्या एका महजराचा शोध लावल्यासंबंधाचे स्पष्टीकरण प्रसिद्ध झाले आहे.
“ मौजे नागेवाडी प्रांत वाई येथील कदीम पाटीलकी मूळची महाराची छत्रपती राजारामाचे वेळी सेटी बिन नागनाक महार हा पाटील होता. त्याने नागेवाडी येथील नागवडसिद्ध ह्या देवाची पूजा करून राहण्याकरिता धांडेघर व गौडाली येथील मोरोजी व चिंतामणी हे दोन गुरव आणिले. हे दोन गुरव येऊन राहिल्यानंतर त्यानी पाटलाशी 'मारेचुरे' करून त्याची पाटीलकी बळकावली. तेव्हा सदर पाटलाने गुरवाविरूद्ध परशरामपंत प्रतिनिधीकडे फिर्याद केली. प्रतिनिधीनी गुरवास बोलावले, पण ते आले नाहीत. तेव्हा प्रतिनिधींनी सिवधडे ह्यास (म्हणजे नागेवाडी जवळील गावाचे मुकादमास) विचारले. त्यांनी पाटीलकीचे वतन महारांचेच, गुरवांनी देवे पुजून असावे; पाटीलकीस त्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही असा महार पाटलाचे बाजूचा निकाल दिला. उभयता गुरवांनी पुनःछत्रपतीकडे फिर्याद नेली. त्या वेळी छत्रपती रांगण्यास होते. तेव्हा ही पाटीलकीची फिर्याद पुनःआलेली पाहून राजारामांनी महारास धार दिव्य करण्यास सांगितले. म्हणजे मोगलांनी घेतलेला वैराटगड †(हा वाईजवळ आहे) स्वराज्यास जोडून द्यावा व पाटिलकीचे वतन अनुभवाने असा निकाल दिला. त्या वेळी मोगलांनी एक एक किल्ला घेऊन पुढे जावे व मागून मराठ्यांनी ते ते किल्ले स्वराज्यास जोडावे असे चालू होते. अशातला वैराटगड हा नागेवाडीच्या महारांनी मोगलांशी लढून घेतला व पाटीलकीचे वतन मिळविले. ह्या पाटीलकीचे वतनाबद्दल नागेवाडीच्या गुरवा-महारांमध्ये तीन वेळा फिर्यादी झाल्या. तीनही वेळा महारांचेच वतन ठरले. शेवटी फिर्याद शके १६७४ मार्गशीर्ष शु. ४ इ. स. १७५३ डिसेंबर, ता. ९ रोजी होऊन अखेर निकाल झाला” [भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न-महर्षी वि. रा. शिंदे, महाराष्ट्र शासन.-१९७६,
पा. १५३].
नामदेव महाराज :--(१२७०-१३५०) महाराष्ट्रातील सगुणोपासनाप्रधान भागवतधर्माचा आद्य प्रवर्तक, संत प्रचारक व कवि. याच्या पूर्वजाचे मूळ
मोगलांच्या ताब्यातून वैराटगड हा किल्ला जिंकण्यांसाठी खुद्द राजाराम महाराजांनी सेटी बिन नागनाक महाराची नेमणूक केली. थोड्याशा महार सैनिकांच्या सहाय्याने त्याने मोगलांच्या प्रचंड सेनेला किल्ल्यातून पळवून लावले व तो वैराटगड किल्ला मराठी साम्राज्यात सामील करून दिला.
डब्ल्यू-२०७३-३६ अ