डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५५८
ठिकाण श्रीक्षेत्र कऱ्हाडनजीक कृष्णातीरी असलेले नरसी ब्राह्मणी हे गाव. यांचे पूर्वज जातीने शिंपी होते व ते शिंप्याचा अगर कापड विकण्याचा धंदा करीत. दामाशेटीस गोणाबाईचे पोटी हे पुत्ररत्न इ. स. १२७० रविवारी सूर्योदय समयी पंढरपूर मुक्कामी झाले. यांच्या घरात विठ्ठलभक्ती मूळचीच होती व त्यामुळेच याची मातापितरे पंढरपुरास राहत. १२ व्या वर्षी गोविंदशेट सौदागरकर याची मुलगी राजाई हिच्याबरोबर विवाह, याला नारायण, विठा, महादा व गोंदा अशी मुले झाली. १२९१ मध्ये ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून आळंदीस आला व गुरूपदेशाकरिता विसोबा खेचर चाटी (यजुर्वेदी ब्राह्मण) याजकडे रवानगी. नंतर संतमंडळासह हा तीर्थयात्रेस निघाला. त्यावेळी वय २२. यात्रा करीत असताना ठिकठिकणी याने वसाहती स्थापन केल्या. पंजाबात बहोरदास, जयदेव, जाल्होन व लद्धा यांनी याच्या मताचा पुरस्कार केला. जाल्होन नामदेवाबरोबर महाराष्ट्रात आला तर उलट तारापुरचा केशव या महाराष्ट्रीय वारकऱ्यास पंजाबात कार्य करण्यास पाठविले.
ते जातिव्यवस्थेला मानीत नव्हते. त्यांनी सर्व जाती व वर्णाच्या लोकांना आपले अनुयायी बनविले. त्यांचा मृत्यु इ. स. १३५० मध्ये झाला.
नायर, सर शंकरन् (१८५७-१९३४) :--मद्रासकडील एक हिंदी पुढारी. वकिली करीत असताना मद्रास हायकोर्टाचे न्यायधीश झाले. मद्रास कायदेमंडळात अनेक वर्षे सभासद. अमरावती येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. मद्रास सामाजिक परिषदेचे अध्यक्ष, 'मद्रास लॉ जर्नल', 'मद्रास Req’ ह्या मासिकांचे व 'मद्रास स्टँडर्ड ' या दैनिकाचे संस्थापक व काही काळ संपादक. १९१५ ते १९१९ मध्ये व्हॉईसरायच्या कार्यकारी मंडळाचे सभासद. १९२८ मध्ये सायमन कमिशनबरोबरच्या लेजिस्लेटिव्ह कमिटीचे अध्यक्ष गांधी व अराजकता' ह्या इंग्रजी पुस्तकाचे कर्ते. स्वतंत्र वृत्ती, सडेतोड बोलणे व लिहिणे. |
निकाळजे : पूर्ण नाव रामचन्द्र सटवाजी निकाळजे. डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष १९२३ ते १९२६ च्या दरम्यान मुंबई कायदेमंडळाचे सरकारनियुक्त सभासद होते.
नेपोलियन बोनापार्ट (१७६९-१८२") :--फ्रान्सचा बादशहा. जगविख्यात योद्धा, रणपदू , लोकोपयोगी कायदे करणारा बादशहा. याचे 'नेपोलियन कोड' प्रसिद्ध आहे. जन्म १५ आगस्ट १७६९ रोजी, कॉर्सिया बेटातील अजाशिओ गावी.
डब्ल्यू-२०७३-३६ ब