व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५५९
वडिलांचे नाव चार्लस् आणि आईचे लिटेशिया. नेपोलियनच्या जन्मापूर्वी काँसिकाचे फ्रेचांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू होते. ही झुंज साठ वर्ष चालून अखेरीस
Pad त्यात जय झाला. नेपोलियनच्या आई-वडिलांनी या स्वातंत्र्युद्धात
फ्रेचाविरूद्ध भाग घेतला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनीच नेपोलियनचा जन्म झाला. नेपोलियनचे वडिल वकिलीचा व्यवसाय करीत. त्याचे कुळ खानदानी होते. नेपोलियनचे शिक्षण बीनच्या शाळेत व पुढे लष्करी शाळेत झाले. याच वेळेस पॅरिस क्रांतीने पेटून निघाले व राज्यक्रांती होऊन २-१२-१८०४ रोजी नेपोलियन बहुमताने फान्सचा बादशहा झाला. १८१५ च्या alee येथील लढाईत पराभव होऊन शेवटी त्याची रवानगी सेंट हेलिना बेटावर झाली. व तेथेच मुत्यू. त्याचा पराभव करणाऱ्या ड्युक ऑफ वेलिंग्टनने त्याच्याविषयी म्हटलय-''नेपोलियनची रणांगणावरची उपस्थिती चाळीस हजार फौजेच्या तोडीची होती, एवढा तो रणपटू व रणशूर होता ! ”
परमानंद, भाई (१८७४-१९४७).--पंजाबमधील आर्यसमाजाचे एक निष्ठावंत पुढारी. गदर कटात सामील असल्याच्या आरोपावरून देहांताची शिक्षा. पण ती कमी होऊन जन्मठेप व हद्दपारीची शिक्षा, दोन महिने अन्नसत्याग्रह केल्यावर सुटका. १९३३ साली अजमेर येथील अखिल भारतीय हिंदुमहासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, 'जातपात तोडक मंडळा' चे संस्थापक. सुधारणावादी व पुरोगामी विचारसरणी. हिंदुस्थानचा इतिहास व आत्मचरित्र लिहिले.
परांजपे, डॉ. रघुनाथ पुरूषोत्तम (१८७६) :--एक महाराष्ट्रीय विद्वान व शिक्षणतज्ज्ञ, जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी, शिक्षण मराठा हायस्कूल (मुंबई), फर्ग्युसन कॉलेज (पुणे) व सेन्ट जॉन्स कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. हिंदुस्थानातील सर्व परिक्षात हे पहिले आले होते. सरकारी शिष्यवृत्ती मिळून इंग्लडला गेले. १८९९ साली केम्न्रिजला पहिल्या दोन सिनियर
woes एक. १९०२-२४ पर्यंत फर्ग्युसन कॉलेजचे प्रिसिपॉल व गणिताचे
प्राध्यापक "णून काम केले. १९१६-२३ व १९२६ साली मुंबई विशवविद्यालयातफे कायदेमडळात सभासद म्हणून निवडून गेले. याचे आधी १९१३ साली हे मुंबई कायदेमंडळःत सरकारनियुक्त सभासद होते. त्यावेळी हे तेथील शिक्षणमंत्री झाले (१९२१-२३, १९२६). १९२७ साली यांची भारतमंत्र्याच्या इंडिया कौन्सिलचे सभासद म्हणून लंडन येथे नेमणूक. १९३५ च्या फेब्रुवारीत हे हिंदुस्थानात परत आले व पुनः फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापकाचे काम