डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५६०
करू लागले. लखनौ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले (१९३५). १९५६
पक्षाचे असून पासून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. हे राजकारणात प्रागतिक यांना लिबरल फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा मान प्राप्त झाला. हे बुद्धिवादी समाजसुधारक असून निर्भयपणे आपल्या मताच्या प्रतिपादनाबद्दल आणि ती मते व्यवहारात आणण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. यांचे ग्रंथ-G०एa] Krishna Gokhale, The Crux of the Indian problem, Religion and
the Indian Problem, Rationalism in Practice.
पाणंदीकर, गोपाळराव व्यंकटेश :--डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते. ह्यांची पत्नी १८८१ ला मृत्यू पावली होती. पत्नीच्या निधनानंतर आपणास विधवाविवाह कर्तव्य आहे असे आपले मनोगत न्यायमूर्ती रानडे, शंकरराव पंडित व मामा परमानंद यांना कळविले होते. सुधारक म्हणविणारे पुढारी स्वतःच्या बाबतीत पुढाकार घेत नाहीत ही टीका केली जात असे. ह्याची प्रचीती पाहावी म्हणून गोपळराव पाणंदीकरांनी डॉ. भांडारकरांच्या विधवा कन्येस पत्राने मागणी घातली. भांडारकर कसोटीस उतरले व ११ मे १८९१ रोजी खंडाळा येथे गोपाळराव पाणंदीकर व शांताबाई यांचा पुनर्विवाह
झाला.
गोपाळराव पाणंदीकर व डॉ. भांडारकर यांची विधवा कन्या शांताबाई यांचा पुनर्विवाह हा महाराष्ट्रातील पहिला पुनर्विवाह नव्हे. पहिला महाराष्ट्रीय पुनर्विवाह ८ मार्च १८६० रोजी सारस्वत जातीतील रघुनाथ जनार्दन भांडारकर व विधवा नर्मदाबाई ह्यांच्यात झाला. ही दोघे मुंबईला एकाच शाळेत शिकत असत. ग्रामण्याच्या भयाने ह्यांनी आपला विवाह पुण्यात उरकला. रघुनाथ भांडारकर यांची प्रथम पत्नी मात्र हयात होती.
पालये, पांडुरंग भास्करशास्त्री : हिंदुधर्मशास्त्रांवरील एक अधिकारी व्यक्ती. जन्माने ब्राह्मण परंतु सनातनी वृत्तीचा लवलेशही नाही. दलितांबद्दल व बाबासाहेबांबद्दल -खूप प्रेम. त्यांचा संबंध बाबासाहेबांशी शेवटपर्यंत टिकून राहिला. अत्यंत पुरोगामी व सुधारणावादी अशी व्यक्ती.
पांगारकर, ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र (१८७२-१९४१) :--संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, मराठी वाड्मयाच्या इतिहासाचे चिकित्सक लेखक, उत्तम वक्ते व रसाळ प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध. १९०७ मध्ये “मुमुक्षू. हे साप्ताहिक सुरु केले. पुढे ते मासिक झाले. २५ वर्ष त्याचे त्यांनी संपादन केले. भक्तिमार्गप्रदीप, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन, एकनाथचरित्र, ज्ञानेशवरचरित्र आणि ग्रंथविवेचन, श्री. तुकाराम चरित्र, मुक्तेश्वर चरित्र आणि काव्यविवेचन आणि मराठी वाङ्मयाचा इतिहास (तीन खंडात) ह्या ग्रंथांची निर्मिती. 'चरित्रचंद्र' हे आत्मचरित्र.