आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५६२
१९१६ च्या नोव्हेंबरमध्ये स्थापन ब्राह्मणेतर चळवळ :--दक्षिण हिंदुस्थानात
ह्या संस्थेचे पुढारी होते झालेल्या पिपल्स असोसिएशनने आरंभिली होती.
मुख्य हेतू होता डॉ. टी. अम्. नायर आणि पी. त्यागराज चेट्टी. ह्या चळवळीचा ब्राह्मण समाजाच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या राजकीय सत्तेला पायबंद घालणे. मद्रास इलाख्यात ब्राह्मणेतरांची संख्या एका ब्राह्मणास २२ ब्राह्मणेतर अशा प्रमाणात होती. शिक्षण, धार्मिक अधिसत्ता, आर्थिक सत्ता, राजकीय वजन व सामाजिक प्रतिष्ठा ह्यामुळे मद्रास इलाख्यात ब्राह्मण वर्ग प्रबळ व प्रतिष्ठित
बनला होता.
बुद्ध, गौतम (इ. पू. ५६३-४८३) :--नेपाळच्या दक्षिणेस तराईच्या मैदानात
रोहिणी नदीच्या तीरावर कपिलवस्तु येथील शाक्य वंशीय राजा शुद्धोदन यांचा
हा पुत्र. जन्म लुंबिनी. मूळनाव सिद्धार्थ परंतु गौत्रनाम गौतम म्हणून सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध. इ. पू. ५२८ मध्ये बुद्धत्व प्राप्ति आणि धम्मचक्रप्रर्वतन. प्रत्येक व्यक्तिची आणि समाजाची जडणघडण सदाचाराद्वारे व्हावी म्हणून त्यांचा
धम्माचा केंद्र बिंदू सदाचार. याकरिता त्यांनी पंचशील, मध्यम मार्ग एवढेच नव्हे
तर प्रत्येक व्यक्तिला बुद्धत्व प्राप्ति करता यावे म्हणून दहा पारमितांच्या मार्गांची शिकवणूक दिली. स्वातंत्र्य, समता, बन्धुत्व यावर अधिष्ठित व्यक्ति आणि
मानवजात निर्माण व्हावी म्हणून भिख्खू आणि स्वतः त्यांनी वरील सर्वच मूल्यांचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार केला. जात, वर्ण अथवा वंश श्रेष्ठत्वाचा कठोरपणे
विरोध केला. "प्रतीत्य समुत्पाद ' हा विज्ञानावर आधारित सिद्धांत
मांडला. लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून प्रत्यक्षात भिख्खू संघाचे नियम
लोकशाहीवर आधारित केले. जगात दु:ख आहे आणि दुःखाचे निवारण करून प्रत्येक व्यक्ति निर्वाण प्राप्त करु शकतो याकरिता सामान्य जनाकरिता अष्टांगीक मार्गाची शिकवणूक दिली. ' सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा, असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा ' हा व्यक्ति विकासाचा, सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचा मूळ
सिद्धांत दिला. त्यांच्या हयातीत वैदिक धर्म नष्ट झाला आणि जम्बुद्विपातील
(भारत) संपूर्ण समाजाने (स्त्रियांनी सुद्धा) बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
ब्राह्मण वर्गाचे यामुळे सर्वक्षेत्रिय प्रभुत्व नष्ट झाल्याने इ. पू. १८५ मध्ये सम्राट अशोकाचा नातू सम्राट बृहदत्ताचा त्याचाच सेनापती ब्राह्मण पुण्यमित्रशुंगाने शिताफीने खून केला आणि त्याने आणि त्यापुढे ब्राह्मण वर्गाने बौद्ध धम्माविरुद्ध प्रतिक्रांती सुरू ठेवली. ती भारतातून बौद्ध धम्माचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत म्हणजे इ. स. १४०० पर्यंत सुरू होती. परंतु सम्राट अशोकाने ६४००० धम्मदूत