व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 611

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५६३

जगात पाठविल्यामुळे जगातील बहुतांश देशात बौद्ध धम्म आहे किंवा त्याची विचारधारा अनुसरल्या जात आहे. सद्यःस्थितीत जगाच्या विनाशाला केवळ बुद्धाचे तत्त्वज्ञानच वाचवू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून उच्चाटन केलेल्या बौद्ध धम्माची पुनर्स्थापना अशोक विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्मचक्रप्रवर्तन करून केली आहे. त्यांचा ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' हा ग्रंथ, भगवान बुद्धाच्या जीवन आणि कार्यावरील अमोल ठेवा आहे.

बोले, रा. ब. सीताराम केशवराव (१८६९-१९६१) :--एक सामाजिक कार्यकर्ते. कामगार, अस्पृश्य व मागासवर्गीय बहुजनसमाजाच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी कार्य. भंडारी जातीत पालशेत गावी जन्म, मॅट्रिकनंतर समाजकार्यासाठी वाहून घेतले. १२ जानेवारी १८८० रोजी ' कित्ते भंडारी ऐक्यवर्धकमंडळी ' ची स्थापना. १९११ च्या ऑक्टोबर महिन्यात ' जस्टिस '

ऑफ दि पीस ' (५. P.) चा बहुमान भंडारी जमातीत सर्वप्रथम. १९१८ च्या

नोव्हेंबरमध्ये ' पीपल्स युनियन ' किंवा ' लोकसंघ ' या राजकीय संस्थेची स्थापना. १९२० मध्ये विधीमंडळात निवडून आल्यावर अनेक लोकोपयोगी कार्ये. ४ ऑगष्ट १९२३ ला अस्पृश्यांसाठी सार्वजनिक ठिकाणे मुक्त असावीत ह्या अर्थाचा ठराव विधीमंडळात पास करून घेतला. १६ फेब्रुवारी १९२५ ला ' नवयुग ' साप्ताहिकाची सुरुवात केली. १ मार्च १९२९ रोजी ' रावबहादूर ' ही पदवी मिळाली. डॉ. आंबेडकरांनी स्थापना केलेल्या ' पीपल्स एज्युकेशन सोसायटी “च्या कार्यकारी मंडळाचे सभासदही होते.

बोल्शेव्हिजम :--रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची परिषद १९०२-३ साली ब्रुसेल्स व लंडन येथे भरली होती. तेथे जहाल व मवाळ असे दोन पक्ष पडून जहाल पक्षास बहुमत मिळाले. त्यावरून या पक्षाला ' बोल्शेव्हिकी ' म्हणजे बहुमतवाला पक्ष व मवाळ पक्षास ' मेन्शेव्हिकी ' म्हणजे अल्पमतवाला पक्ष असे नाव मिळाले. या दोनही पक्षांची चळवळ कमी अधिक प्रमाणात पुढे चालू होतीच. १९१७ च्या आक्टोबरमध्ये बोल्शेव्हिक पक्षाने राज्यक्रांती करुन रशियात मजुरांची सत्ता स्थापण केली. बोल्शेव्हिक पक्षाने राज्यक्रांती केली म्हणून रशियन सरकारास ' बोल्शेव्हिक' सरकार असेही म्हणतात. आणि या सरकारची जी राजकीय व आर्थिक तत्त्वे आहेत त्यास मूळ पक्षाच्या नावावरून ' बोल्शेव्हिझम्‌ ' असे नाव रूढ झाले आहे.

बोस, बाबू सुभाषचंद्र (१८९७-?) :--एक क्रांतिकारक श्रेष्ठ पुढारी व स्वतंत्र्य हिंदी फौजेचे नेताजी. शिक्षण कलकत्ता व केंब्रिज येथे. १९२२ ते २४ साली