व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 612

५६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बंगालच्या कायदे कलकत्त्यातील 'फारवर्ड' या पत्राचे व्यवस्थापक. १९२६ मध्ये

कमिशनवरील बहिष्कारात कौन्सिलात सभासद. १९२७ मध्ये सायमन

Indian भाग. अनेकवेळा तुरुंगवास. त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष, Struggle या ग्रंथाची निर्मिती. दुसरे महायुद्ध १९४१ मध्ये चालू असताना एकाएकी हिंदुस्थानातून अदृश्य. जपानमध्ये जाऊन १९४३ साली स्वतंत्र हिंदुस्थानच्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेची घोषणा. हिंदुस्थानच्या मुक्तीसाठी आझाद हिंद सेनेची उभारणी. सिंगापूरहून येत असता विमान अपघात व त्यात

ठार झाल्याची वदंता.

भांडारकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ (१८३७-१९२५) :--गाढे संस्कृत पंडित, प्राच्यविद्याविशारद व पुराणवस्तुसंशोधक. गार्टिजन या जर्मन युनिव्हर्सिटीकडून १८८५ मध्ये व कलकत्ता या युनिव्हर्सिटीकडून १९०८ मध्ये पीएच्‌. डी. ही पदवी तसेच मुंबई व एडिंबरो ह्या दोन विद्यापीठांकडून एल्‌एल्‌.डी. चा बहुमान. १९११ मध्ये दिल्ली दरबारच्या प्रसंगी 'सर' (के. सी. आय. इ.) हा किताब. प्रार्थना समाजाचे एक मोठे आधारस्तंभ. त्यांची रक्षा पुण्याच्या प्रार्थना समाजात स्तूप

बांधून ठेवली आहे.

भोपटकर, भास्कर बळवंत (१८७४-१९४८) :--' भालाकार ' भोपटकर म्हणून प्रसिद्ध. नामांकित वकील व उत्तम वक्ते. टिळकांचे कट्टर अनुयायी. हिंदू धर्म व संस्कृतीचे कट्टर पुरस्कर्ते. वृत्तीने सनातनी. म्हणून सामाजिक सुधारणांना विरोध. स्वमताच्या प्रसारार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी ५ एप्रिल १९०५ ला ' भाला ' नावाच्या वृत्तपत्राची सुरुवात. सहा वर्षे चालून ते पुढे १४ वर्ष बंद राहिले. पुन्हा २०-४-१९२५ ला सुरू होऊन २९-८-१९३५ पर्यंत चालले. ह्या ' भाला ' वृत्तपत्रातून भोपटकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अत्यंत शिवराळ

भाषेतून टीका केली.

भोसले, नारायण धनाजी :--हे डिप्रेस्ड इंडिया असोसिएशनचे चिटणीस म्हणून मुंबईत सामाजिक चळवळ करीत होते. १९२३ च्या नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांना सार्वजनिक आयुष्यात ज्या अनेक लोकांशी वाकडेपणा पत्करावा लागला, त्यापैकी भोसले हे एक गृहस्थ होत. त्यांच्याशी डॉ. आंबेडकरांचा वाकडेपणा येण्याची जी अनेक कारणे होती त्यापैकी शिवतरकरांच्या विरुद्ध अनेक लोक अनेक प्रकारच्या कागाळ्या करीत. पण बाबासाहेब नेहमी शिवतरकरांची बाजू घेत. बाबासाहेब व भोसले यांनी परस्परांवर वर्तमानपत्रातून टीका केल्या आणि कोर्टात खटले भरले. डॉ. आंबेडकर हे आपले उच्च शिक्षण आटोपून