व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५६५
भारताला येण्यापूर्वी त्यांचा सत्कार करण्यासाठी ' डॉ. आंबेडकर मानपत्र फंड ' स्थापन करण्यात आले होते. त्याचे चिटणीस श्री. ना. ध. भोसले होते. परंतु बाबासाहेबांनी मानपत्र घेण्याचे नाकारले.
मध्वाचार्य (शके १११७-११९८) :--द्वैतमताचा प्रस्थापक. कर्नाटक प्रांतात उडुपीजवळील रजतपीठ गावी जन्म. बापाचे नाव मध्वगेह व आईचे वेदवेदी. अनंतेश्वराच्या उपासनेमुळे झाला म्हणून त्याचे नाव वासुदेव ठेवले. गुरूचे नाव अच्युतप्रेक्ष्याचार्य. वेदाध्ययन संपल्याबरोबर संन्यासाश्रम स्वीकारला. तेव्हाचे नाव पूर्णप्रज्ञ, वेदान्तशास्त्राचे स्वतंत्र बुद्धीने अध्ययन. त्यातील प्राविण्याने गुरूने त्याचे आनंदतीर्थ नाव ठेविले. सर्व हिंदुस्थानभर संचार करून अद्वैतादि निरनिराळ्या विरोधी मतांच्या आचार्यांबरोबर वाद करून विजय मिळविला. उडुपी येथे त्याने कृष्णमूर्तीची स्थापना. स्वमताच्या स्थापनेसाठी ब्रह्मसुत्रावर, गीतेवर व इतर काही उपनिषदांवर भाष्ये लिहिली. यांचे प्रसिद्ध शिष्य पद्मनाभतीर्थ, नरहरितीर्थ, माधवतीर्थ, व अक्षोभ्यतीर्थ हे चौघे होत. द्वैत म्हणजे भेद. यांच्या मते स्वतंत्र व अस्वतंत्र अशी दोन तत्त्वे आहेत. भगवान विष्णु हा स्वतंत्र असून तो सर्व सद्गुणांनी मंडित व दोषरहित आहे, तदितर सर्व अस्वंतत्र आहेत. जीवेश्वर भेद, जडेश्वर भेद, जीवाजीवभेद, जीवजडभेद, व जडाजडभेद, असे पाच प्रकारचे भेद मानले आहे.
महावीर, पार्श्वनाथ :--हे बुद्धाच्या समकालिन होते. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या अगोदर १५ वर्षे महावीर हे नव्या धर्माचा उपदेश जनतेत करू लागले. तो धर्म जैन-धर्म म्हणून प्रसिद्धीस आला. जैन व बौद्ध धम्म यांच्या अगोदर आर्य धर्म किंवा वैदिक धर्म चालू होता. या धर्माचा (वैदिक) पाया यज्ञयागावर उभारलेला होता व त्या यज्ञयागांना उचलून धरणारे वैदिक वाङ्मय (वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, आरण्यके आणि श्रुति व स्मृति) ब्राह्मणांनी तयार केलेले होते. यज्ञयागांना उपसर्ग शेतकऱ्यांना व बहुजन [समाजाला ] [होई. ] यामुळे सामान्य जनता नागवली जाई. या परिस्थितीचा संताप महावीर व बुद्ध यांना आला आणि यज्ञयागात जी पशुहत्या होई त्यावर हल्ला चढविण्यासाठी अहिंसा तत्त्वाचा उपदेश सुरू केला. महावीराने अहिंसा तत्त्वाला आपल्या धर्माचा मुलाधार निर्धारित केला.
मॅक्डोनल्ड रॅम्से (१८६६-१९३७) :--ब्रिटीश मुत्सद्दी, पहिला मजूर पंतप्रधान आणि ब्रिटीश मजूर पक्षाचा संस्थापक. स्कॉटलंडच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या लुसीमाऊथ गावी जन्म. हा घरकाम करणाऱ्या नोकराणीचा अनौरस पुत्र. याचे वडील जरी शेतीवरील मजूर असले तरी त्यांनी कधीही ही कामे केली