व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 614

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५६६

नाहीत. रॅम्से यांचे शिक्षण १२ व्या वर्षीच संपुष्टात आले. तो प्रथम ब्रिस्टोल नंतर लंडनला आला. ब्रिस्टोलला प्रथम त्याने सोशॅलिस्ट संघटनेशी संपर्क साधला. लंडनमध्ये तो' सायकलिस्ट टूरिंग क्लब ' मध्ये नोकरीला होता. पुढे १८८८ मध्ये क्रांतिवादी राजकारणी थॉमस लो यांच्याकडे चिटणीसाचे काम केले व वृत्तपत्रकाराचेही काम करू लागला. १८९४ मध्ये तो प्रसिद्ध फेबियन सोसायटीचा तसेच नवीनच स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा सभासद झाला. व लौकरच त्याने वक्ता म्हणून प्रसिद्धी मिळविली. २२ जानेवरी १९२४ रोजी ते पहिले मजूर पंतप्रधान म्हणून निवडून आले. अनेक ग्रंथांची रचना केली.

माटे, श्रीपाद महादेव (१८६६-१९५७) :--अस्पृश्योद्धाराविषयी झटत असल्याचे दर्शविणारे ब्राह्मण गृहस्थ. त्यामुळे महार माटे मास्तर म्हणून प्रसिद्ध. पुणे हिंदुमहासभेच्या कार्यकारी मंडळाचे १९२४-३० या काळात सभासद. प्रभावी वक्ते व एक मराठी साहित्यिक. अस्पृश्यांचा प्रश्न, उपेक्षितांचे अंतरंग, हिंदुसमाजदर्शन, विवेकमंडन इत्यादी पुस्तके लिहिली.

मालवीय, पं. मदनमोहन (१८६१-१९४६) :--एक हिंदू पुढारी. जन्म प्रयाग येथे. १८८४ मध्ये उच्च शिक्षण पूर्ण. साहित्यसेवेत व जनसेवेत रुची. वैदिक साहित्याचा गाढा अभ्यास. विविध वृत्तपत्रांचे संपादन. काशी येथील हिंदु विशवविद्यालयाचे संस्थापक. शेवटपर्यंत त्याचे उपकुलगुरू. चारदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू महासभेचे तीनदा अध्यक्ष, धार्मक व सामाजिक बाबतीत आर्यसमाजाचे कट्टर विरोधी, बरेचसे सनातनी, सर्व कर्मकांड, रीतीरिवाज, मूर्तिपूजा वगैरे हिंदू धर्माची अभिन्न अंगे आहेत हा विश्वास.

मि. मॉन्टफर्ड :--दक्षिण भागाचे कमिश्नर मि. ए. जे. मॉन्टफर्ड. दि. १४-८-१९२५ रोजी, प्रत्येक गावातील महार कामगारांची कमीत कमी अशी जरूर तेवढीच संख्या मुक्रर करण्यात यावी आणि प्रत्येकाला दरमहा १५ रुपये पगार ठरवावा, त्याचप्रमाणे महारांच्या वतनी जमिनीला कर माफ करावा. अशा अर्थाचा ठराव श्री. निकाळजे यांनी मांडला. त्यावर चर्चा झाली. ( Vol. xv, pp. 1383-96 ) हा ठराव सरकारने मंजूर केला तर सरकारला ५० लाख रु. खर्च येईल, असे दक्षिण भागाचे कमिशनर मि. ए.जे. मॉन्टफर्ड यांनी सांगितले. हा खर्च मध्यभागात ७२ लक्ष रुपयाचा येईल, असे मध्यभागाचे कमिश्नर मि. जी. डब्लू. oa यांनी सांगितले. महार हे फार शूर, बुद्धिमान, व राजनिष्ठ आहेत, असे त्यांनी उद्‌गार काढले. महसूलमंत्री श्री. लल्लुभाई मेहता यांनी असे सांगितले