व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५६७
की, सरकार महारांची स्थिती सुधारण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहे. या ठरावामुळे सरकारला फार खर्च करावा लागेल व त्या मानाने फलप्राप्ती फारशी होणार नाही. हा ठराव मतास टाकला तेव्हा १५ विरुद्ध ३४ मते पडली. श्री. निकाळजे यांनी ठराव परत घेतला.
( डॉ. भी. रा. आंबेडकर : द्वितीय खंड - चां. भ. खैरमोडे, पा. ३५. )
माँटफर्ड सुधारणा कायदा म्हणून प्रसिद्ध. १९१९ साली तो मंजूर करण्यात आला मात्र अंमलबजावणी १९२० साली. या कायद्यानुसार हिंदुस्थानात दुहेरी राज्यव्यवस्था (Dyarchy) अंमलात आली. राखीव व सोपीव असे प्रांतिक राज्यकारभाराचे दोन भाग पाडून शिक्षण, आरोग्य, शेती व अबकारी खाती लोकनियुक्त मंत्र्यांच्या हाती सोपविली गेली परंतु मुलकी, न्याय, पोलीस, तुरुंग अशी खाती राखीव ठेवली गेली. मध्यवर्ती सरकारात हिंदी लोकांना अधिकाराच्या जागा जवळ जवळ काहीच नव्हत्या. सैन्य, पैसा, परराष्ट्रसंबंध, रेल्वे, व्यापार व कायदा हे सर्व इंग्रजांच्या ताब्यात होते.
मिंटो, लॉर्ड गिल्बर्ट जॉन (१८४५-१९१०) :-हिंदुस्थानचे व्हाईसरॉय. केंब्रिज येथे येऊन शिक्षण घेऊन बी. ए. झाले. लॉर्ड कर्झननंतर व्हाईसराय म्हणून भारतात आले. बंगालच्या फाळणीमुळे देशात अराजक चळवळ वाढली, त्याला तोंड देण्याकरिता यांनी मुद्रण नियंत्रणाचा कायदा केला. लो. टिळकांसारखे लोक तुरुंगात गेले. यांनी मोर्ल-मिंटो सुधारणा जाहीर करुन कायदेमंडळाची वाढ, प्रतिनिधित्व, शिफारसवजा ठराव करण्याचा व उपप्रश्न विचारण्याचा अधिकार, कार्यकारी मंडळात बिनसरकारी माणसांचा प्रवेश वगैरे गोष्टी केल्या.
मुस्लिम लीग :--राष्ट्रीय चळवळीच्या दडपणाखाली हिंदी लोकांना काही प्रमाणात राजकीय हक्क देण्यास इंग्रज सरकार जेव्हा प्रवृत्त झाले, तेव्हा त्या सत्तेत भरपूर वाटा मिळविण्यासाठी मुसलमानांनाही स्वतंत्र राजकीय संघटनेची गरज भासू लागली. ऑक्टोबर १९०६ मध्ये आगाखानांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम शिष्टमंडळाने लॉर्ड मिंटो यांची भेट घेऊन मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. त्यानंतर व्हाईसरॉयसाहेबांच्या प्रोत्साहनाने व शिष्टमंडळातील पुढाऱ्यांच्या प्रयत्नाने १९०६ सालच्या अखेरीस मुस्लिम लीगचा जन्म झाला. सुरवातीच्या लीगमध्ये मोठेमोठे जमीनदार व सरकारी अधिकारी [यांचे ] प्राबल्य असून बहुतेक पुरोगामी कार्यकर्ते व विचारवंत [तिच्यापासून ] [अलिप्त ] होते. पुढे १९१३ साली लीगची पुनर्घटना होऊन आगाखान, [अमीर ] [अली ] यासारखे जुने पुढारी मागे पडले आणि राजनिष्ठेला [बाध ] [न ] [आणता ] [स्वराज्याचे ] हक्क मिळविण्याची लीगने घोषणा [केली ] [पण ] [पुढे ] [ही ] [भावना ] [नष्ट ] [झाली. ]