आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५६८
मोर्शी जिल्हा अमरावती, या मुंडले, महादेव सिताराम :--वऱ्हाडातील
गृहस्थ. अस्पृश्यता व जातिभेद गावातील एक वकील. सुधारक वृत्तीचे
विरोधी, पुरोगामी विचारसरणी.
राजभोज, पांडुरंग नत्थूजी (१९०५-१९८४) :--नासिक जिल्ह्यात चर्मकार जातीत जन्म. धुळे येथे शिक्षण, १९२५ मध्ये सरकारी नौकरीत प्रवेश. सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग. विविध संस्थांचे सभासद. काँग्रेस पक्ष व आंबेडकर पक्ष अशी बरेचदा धरसोड. १९३२ च्या डॉ. आंबेडकर व म. गांधी यांच्यात झालेल्या पुणे करारात यांचीही सही. ' दलितबंधू ' हे मराठी व ' इंडियन स्टेटस् ' हे इंग्रजी साप्ताहिक चालविले. नंतर ' समता ' हे नियतकालिक चालवित होते. एम. एल. सी. असून अखिल भारतीय बौद्ध सभेचे अध्यक्ष होते. एके काळी बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करणारे राजभोज बौद्धधर्म स्वीकारून बुद्धानुयायी झाले
होते.
राजा, एम्. सी. (१८८३-१९४३) :--मद्रास येथील अस्पृश्यांचे पुढारी.
शिक्षण मद्रास येथील खिश्चन कॉलेजात. सरकारच्या विविध समित्यावर सभासद. सायमन कमिशनच्या मध्यवर्ती सल्लागार समितीत एक सभासद. अनेक परिषदांचे अध्यक्षपद भूषविले. अखिल भारतीय हरिजन सभेचे ते अध्यक्ष होते तसेच अखिल भारतीय हिंदुमहासभेचे उपाध्यक्षही होते. गोलमेज परिषदेचे एक सभासद म्हणून लंडनला गेले होते. डॉ. आंबेडकरांच्या विरोधात संयुक्त मतदार संघाच्या -मागणीस पाठिंबा देऊन राजा-मुंजे करार घडवून आणला होता.
यांना रावबहादूर हा बहुमान इंग्रज सरकारने दिला होता.
राजा राममोहन राय (१७७२-१८३३) :--हिंदू धर्माचे पहिले सुधारक. त्यांनी ब्राह्मो समाज २० ऑगष्ट १८२८ रोजी स्थापन केला. खिस्ती धर्माच्या प्रार्थना, भजन इत्यादि भक्ति प्रदर्शक कार्ये ज्या पद्धतीने चालत त्या पद्धतीने ब्राह्मो समाज आपली धामिक कार्ये चालवू लागलां. या समाजाने आपल्या धर्माचा प्रसार उच्च वर्णीय हिंदुमध्येच केला व तोहि फार अल्प प्रमाणात. अस्पृश्यांकडे प्रथमतः त्यांचे लक्ष खेचले गेले नाही. त्यांनी जगातील सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून एकेश्वरवादाच्या निष्कर्षाला आले. सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते. सतीची चाल बंद करण्यास सरकारला महत्त्वाचे सहाय्य केले. १८३० साली इंग्लंडला गेले. १८३३ साली तिकडेच वारले.
रामानंद, आचार्य :--हे आचार्य श्रीरामानुजाचार्यापासून पाचवे आचार्य होत. १३ व्या शतकाच्या अखेरीस किंवा १४ व्या शतकाच्या प्रारंभी यांनी वैष्णवधर्माला