व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 617

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५६९

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय धर्माचे स्वरूप आणलेले होते. यांचा मठ जरी बनारसमध्ये होता तथापि यांनी चहूकडे संचार करुन वैष्णवपंथाचा प्रसार केला. हीन मानलेल्या जातीतूनच यांनी आपले मुख्य बारा शिष्य केले होते. त्यापैकी एक चांभार, दुसरा न्हावी, तिसरा कोष्टी जातीचा होता. सर्व जातीच्या लोकांना यांच्या मठांमध्ये येण्याला परवानगी होती. या मठामध्ये या काळी स्पर्शास्पर्श

नव्हता.

रायनाक महार :--पूर्ण नाव रायबा जानबा गायकवाड. परंतु रायनाक नावानेच इतिहासात ओळखला जातो. हा रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडचा रहिवाशी. रायनाकचे वंशज अजूनही इथे राहतात. तो अत्यंत शूर होता. या रायनाकची समाधी इतिहासप्रसिद्ध रायगड किल्ल्याच्या ऐन टकमक टोकाखाली आहे. श्री. द. ग. कुळकर्णी ह्यांनी जुलै १९३३ च्या किर्लोस्कर मासिकात (पान ७२३) वर रायनाकाच्या संदर्भात मासलेवाईक माहिती दिली आहे. ती येणेप्रमाणे :--“डाव्या बाजूस टकमक टोक आहे. याला आज 'रायनाक' टोक म्हणतात. पेशवाईच्या अखेरच्या काळात हा अभेद्य किल्ला सर करण्याची गुरूकिल्ली पाचाडच्या रायनाक नावाच्या महाराने इंग्रजांना सांगितली

आणि इंग्रजांनी त्याप्रमाणे जगदीश्वराच्या उजव्या हातच्या डोंगरावरून तोफा

डागून अत्यंत बिकट जागी असलेल्या मराठ्यांचा दारूखाना उडविला. धूर्त इंग्रजांनी रायनाकला पुढे ह्याच टोकावरून खाली लोटून दिले, म्हणून त्यांच्या नावाने ते आज ओळखले जात आहे.”

परंतु या म्हणण्याला दंतकथेशिवाय कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. या संदर्भात कुलाबा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध इतिहास संशोधक कै. शां. वि. आवळसकर म्हणतात, “रायगड प्रकरणी रायनाक AERTS नाव बदनाम झाले आहे. त्याबाबत इंग्रज ग्रंथकार इतके मुग्ध आहेत की, त्याच्या फितुरीचा मागमूस त्यातून अस्पष्ट स्वरूपातही लागू शकत नाही, तेव्हा रायनाकाच्या फितुरीचा ऐकीव गाजावाजा आहे, तो सर्वश्री निराधार आहे. उलट रायनाक फितुर नव्हता असे सिद्ध करू पाहणारे कागद डॉ. आंबेडकरास उपलब्ध झाले होते. ते कागद जर पुढे आले तर रायनाकाच्या बाबतीत काही मजकूर वाचकापुढे येईल व १४० वर्षावर ज्याच्या नावाला काळीमा लागला त्याचे नाव उज्वल होईल. “

या संदर्भात प्रा. झुंबरलाल कांबळे यानी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करून ती 'अस्मितादर्श' त्रैमासिकाच्या मे-जून ७७ च्या अंकात दिली. ती महत्त्वपूर्ण असून ती येणेप्रमाणे -—" रायनाकाचा कडेलोट टकमक टोकावरून झाला, हे खरे. पण तो इंग्रजांनी केला नाही! पेशव्यांनी केला !! रायनाकाबरोबर आणखी एका माणसाला देहदंडाची शिक्षा दिली. त्यांचे नाव