५७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तुळशी शेडगा. ही माहीती महाडचे सुरेन्द्रनाथ गोविंद उर्फ नानासाहेब टिपणीस आणि पिपल एज्यूकेशन सोसायटीचे कार्यवाह घनःश्याम तळवटकर यांनी दिली. त्यांचे म्हणणे असे की, या संदर्भात उखडे (जि. पुणे) येथील पोतनीसाकडे काही ऐतिहासिक कागदपत्रे होती. ती नानासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिली. बाबासाहेबांनी नंतर 'जनते'त 'रायगडचा रायनाक महार' हा लेख लिहिला...... रायनाकाचा कडेलोट केला पण तो फितूर झाला म्हणून नव्हे. त्याने इमानेइतबारे धन्याची चाकरी केली म्हणून ! जीवाची बाजी लावून रायगडचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला म्हणून !!
संभाजीचा पुत्र शाहू गादीवर आल्यानंतर १७३४ मध्ये रायगड ताब्यात घेतला व तालुक्याचा कारभार यशवंत महादेव पोतनीसाकडे दिला. हे महाड येथे राहत. या पोतनीसातर्फे गडाचा लष्करी कारभार कारखानीस सांभाळीत. त्यांचे मूळ नाव गुप्ते. ते महाराजांच्या गडावरील १८ कारखान्याचे अधिकारी होते. १५-१२-१७७२ ला शाहूचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा सर्व कारभार पेशव्याकडे आला. MEA मृत्यूनंतर वारस रामराजा याने इ. स. १७७२ ला रायगडचा हवालदार यशवंत मोरे यास रायगड ही तख्ताची जागा जकीप्यासुद्धा पेशव्याच्या स्वाधीन करावी' परंतु पोतनीसाने त्यास नकार दिला. पेशव्यांनी अपाजी हरी यास सैन्य देऊन रायगडच्या मोहिमेवर पाठविले. अपाजीने १८ मार्च १७७३ रोजी रायगड ताब्यात घेतला. या युद्धात पोतनीसांच्या वतीने खंडेराव मोरेश्वर लढला. याच युद्धात रायनाक महार लढला असावा. किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोतनीसातफं त्याची नेमणूक कारखानीसांनी केली होती. पेशव्याचा जय झाल्यावर, छत्रपतीचे निशान हाती लागू नये म्हणून रायनाकाने त्याचे प्राणपणाने जतन करून घेऊन तो पोतनीसांकडे गेला. सैनिकांनी तेथे पोतनीस, रायनाक व तुळशी शेडगा यास पकडून पेशव्यांच्या
स्वाधीन केले. रायनाक महार आपल्या मालकाच्या इमानदारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढला, हे पेशव्यांना सहन न होऊन, रायगडावर कैद करून आणले आणि टकमक टोकावरून त्याचा कडेलोट केला. यावरून रायनाक हा फितूर
नव्हता.
राष्ट्रीय सभा :--मुंबई इलाख्यातील एक अधिकारी सर विल्यस् वेडरबर्न, १८७० ते १८७९ या काळात हिंदुस्थान सरकारच्या गृहमंत्र्याचे चिटणीस अँलन ऑक्टेव्हिअन हयुम आणि बंगालमधील सर हेन्री कॉटन यांच्यासारखे एक सेवानिवृत ब्रिटिश अधिकारी आणि दादाभाई, रानडे, बॅनर्जी, बोस, तेलंग वगैरे हिंदी राष्ट्रीय पुढारी यांच्या सहकार्याने साम्राज्यनिष्ठेच्या पायावर आणि सनदशीर