व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५७१
चळवळीच्या आधारावर हिंदी राष्ट्रीय सभेची स्थापना इ. स. १८८५ च्या २८ डिसेंबर रोजी मुंबईस करण्यात आली. १८८४ मध्ये मि. ह्यूम ह्यांच्या धुरीणत्वाखाली 'इंडियन नॅशनल युनियन' या संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेमार्फत पुण्यात १८८५ च्या डिसेंबर मध्ये एक परिषद भरविण्याचे ठरविले. या परिषदेने १८८५ च्या एप्रिलमध्ये एक जाहीर पत्रक काढले-''इंडियन नॅशनल युनियनची एक परिषद ता. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुणे येथे भरविण्यात येईल. या परिषदेस बंगाल, मुम्बई, मद्रास या प्रांतातील सर्व भागातील इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे जाणणारे राजकीय पुढारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील. या परिषदेचे प्रत्यक्ष दोन हेतू असतील--(१) राष्ट्रीय प्रगतीच्या कार्यात अत्यंत कळकळीने भाग घेणारांचा परस्परांशी परिचय व्हावा आणि (२) पुढील साली हाती घ्यावयाच्या राजकीय कार्याची चर्चा करून ती कार्य निश्चित करण्यात यावीत. अप्रत्यक्षरीत्या ही परिषद म्हणजे हिंदी लोकाचे पार्लमेंटचे बीजच होईल. . . . ” अशा प्रकारे सर्व तयारी चालू असता आयत्या वेळी पुण्यास महामारीची साथ उद्भवल्यामुळे हे अधिवेशन मुंबईस भरविण्यात आले.
रोहिदास, संत :--जन्म १५ फेब्रुवारी १३९८ मध्ये चवर वंशात, रविवार माघ पौर्णिमेला काशी जवळ गोवर्धनपूर येथे झाला. काहींच्या मते त्यांचा जन्म मांडूर, माडुगडिह या गावी झाला, त्यांना पंजाबी भाषेत रैदास अथवा रेयीदास, हिंदीमध्ये रैदास अथवा रविदास, राजस्थानी मध्ये रोहिदास, बंगालमध्ये रूईदास किवा रुयदास आणि मराठी मध्ये रोहिदास अथवा रोहितदास अशा नावाने
संबोधिले जाते.
वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांचे आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण होते. परंपरागत चालत ठेवलेल्या अन्याय, अत्याचार व शोषणाच्या विरोधात ते भक्कमपणे उभे राहिले. ते आपले कुटुंब स्वतः कष्ट करून चालवित होते आणि बाकीचा वेळ समाजामध्ये जागृती निर्माण करण्याकरिता घालवीत होते. त्यांच्या विचार धारेचे मूलभूत सूत्र, समाजामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व रुजवून जातिजातीत विभाजित समाजाला संघटित करणे. एक जिनसी समाज निर्माण करणे, हेच होते. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव सामान्य लोकावरच नव्हे तर चितोड राजघराण्यातील राणी मीराबाई, सपना वीर, पीपाजी महाराज, [दिल्लीचा ] सुलतान सिकंदर शाह लोधी यांच्या सारख्यावर झाला आणि त्यांनी त्यांचे
शिष्यत्व" पत्करले.