व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 620

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५७२

पंथाला प्रारंभ झाला. उत्तर त्यांच्या नावाने रोहिदासी अथवा रविदासी

खालील जाति-उपजातीतील भारतात 'रविदासी पंथ' असे समजले जाते. त्यातील

रामदासिया, दास, लोकांना रविदास पंथीय म्हणून स्थान आहे. त्यात रोहिदास,

जटिया, रैदास, रायदास, लडिया, लुनिया, जाटव, धसिया, कुरील, चर्मकार, संखवार, अहिरवार, जैसवार, सतनामी, रामनामी, कठाना, साकेत, सिलावट, भावी, कबीर पंथी, मोची, चौधरी, दोहरे, रैगर, महोबिया, चढार, चोषण, लोमोड, बेंरहा, सिंधु, सुर्यवंशी, चांदोर अशा अनेक जाती आहेत.

गुरु नानक आणि गुरू कबीर हे रविदासांचे समकालीन होते. शीख धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही. त्यात मानवतेला प्रमुख स्थान आहे. त्यामुळे संताच्या दोह्यांना 'गुरुबाणी' मध्ये गुरुवचनांना पवित्रतेचे आणि श्रध्देचे स्थान दिले आहे. शीख धर्माच्या 'गुरूग्रंथ साहिब' या पवित्र ग्रंथात गुरू रविदासांची ४०

पदे समाविष्ट केलेली आहेत.

ते म्हणतात,

“ब्राह्मण, खतरी, वैस, सूद 'रविदास' जनमते नांहि |

जौ चाहइ सुबरन Hs, Wag करमन मांहि |

(रविदास दर्शन, दोहा-१२३)

(कोणी मनुष्य जन्मापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र ठरत नाही.

उच्च कर्मापासून उच्च वर्ण प्राप्त होतो.)

“राग द्वेष कूं छांडि कर, निहकरम करहु रे मीत ।

सुख दुख सम ve थिर रंहि, 'रविदास' सदा मन जीत ॥

(रविदास दर्शन, दोहा-११३)

(तू राग, द्वेष न करता निष्काम भावनेने कर्म करत राहशील तर सुख आणि दुःखात तुझे मन नेहमीच स्थिर राहील.)

रौलत बिल :--१९१९ च्या जानेवारीत रौलट अँक्ट या नावाने दोन कायदे

हिंदुस्थान सरकारने पास केले होते. यास काळे कायदे असेही म्हणतात. पहिले महायुद्ध संपल्यानंतर “डिफेन्स ऑफ इंडिया Sac’ हा कायदा आपोआप रद्द होणार होता. तेव्हा देशातील गुप्त कटाच्या क्रांतिकारक चळवळीचा निःपात करता

यावा म्हणून हे कायदे सरकारने केलेले होते. या कायद्यामुळे कोणत्याही आरोपीस त्याच्यावरील आरोपाची शाबिती सामान्य न्यायासनापुढे उघड

चौकशीअंती झाल्याखेरीज शिक्षा होऊ नये. या मूलभूत नागरिक हक्कावर गदा येऊन हिंदी नागरिकांचे जीवित व वित्त यांच्या सुरक्षिततेस धोका येणार

होता.