व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५७३
लाला लजपतराय (१८६५-१९२८) :--एक नावाजलेले हिंदी पुढारी. पंजाबमधील वैश्य जातीत जन्म. सामाजिक व राजकीय क्षेत्रात फार मोठी कामगिरी. त्यामुळे पंजाबमधील प्रमुख नेता म्हणून नावलौकिक. समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, हिंदी भाषा प्रेमी, सफल लेखक व प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्ध, मॅझिनी, गॅरिबॉल्डी, शिवाजी, कृष्ण, दयानंद इत्यादी चरित्रांचे लेखक. शेवटचे पुस्तक ' दुखी भारत '. हे मिस मेयोच्या ' मदर अिडिया ' ह्या ग्रंथाला उत्तर म्हणून लिहिले. सायमन कमिशनवर बहिष्कारासाठी उभारलेल्या आंदोलनात पोलिसांच्या लाठीचा तडाखा लागून मृत्यू.
लिंकन, अब्राहम (१८०९-१८६५) :--अमेरिकेचे सोळावे अध्यक्ष, राँकस्प्रिग येथे १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्म झाला. १८१८ मध्ये आई वारली व बापाने दुसरे लग्न केले. सावत्र आईमुळे चांगले वळण लागले. घरीच पुस्तकी व शारीरिक शिक्षण मिळाले. २१ व्या वर्षी फेरीवाल्याची नोकरी पत्करून, कायद्याचा अभ्यास केला. १८३२ साली वरील नोकरी सुदून, त्याच सुमारास सुरू झालेल्या ब्लॅक हॉक इंडियन युद्धातील सैन्यात कॅप्टनचा हुद्दा. प्रतिनिधी सभेत निवडून येण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. तेव्हा तो दुकानदारी करू लागला. त्यात कर्ज झाले. १८३४ मध्ये इलिनॉईसच्या प्रतिनिधीसभेचा सभासद म्हणून निवडून आला. मतदानाचा हक्क, कर देणाऱ्या किंवा शस्त्र धरणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांना असावा ह्या मताचा तो होता. गुलामगिरी पद्धतीच्या पूर्ण विरुद्ध होता."
“न्यू ऑलिन्स शहर पाहण्यास गेला असताना एका निग्रो तरुणीचा जाहीर लिलाव चालल्याचे भयानक दृश्य तेथे त्याच्या दृष्टीस पडले. तिला विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी तिची जी विटंबना चालविली होती, ती बघून काळजात कुणी तरी सुरी खुपसावी, असे त्याला दुःख झाले. त्याने आपले डोळे झाकून घेतले आणि संतापाने तळमळत उद्गारला 'मला जर कधी संधी मिळाली तर ह्या राक्षसी गुलामगिरीच्या टाळक्यावर हातोडा घालून मी तिचा चेंदामेंदा करून ' टाकील.”
''ज्या राष्ट्रात वैचारिक यादवी आहे, ते राष्ट्र कोलमडून पडलेच पाहिजे. अर्धे गुलाम आणि अर्ध स्वतंत्र अशा स्वरुपात ते राष्ट्र टिकू शकणार नाही.” असे त्याचे स्पष्ट मत होते. तो लोकशाही विषयी म्हणतो, “गुलामगिरी आणि मालकशाही नष्ट करणे याचेच नाव लोकशाही.”?
१; गणवीर, पृ. ३५०-३५२.
२. आचार्य अत्रे, ही ईश्वराची दया.
डब्ल्यू-२०७३-३७ अ