व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 622

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५७४

गुलामांची पद्धत बंद करण्याचे बिल स्वतःच काँग्रेसमध्ये कोलंबियातील

निवडून आला. त्यावेळी सुरु आणले. १८४६ मध्ये राष्ट्रप्रतिनिधी सभेत

सनद असलेल्या मेक्सिकन युद्धाच्या विरुद्ध होता. १८३६ मध्ये वकिलीची मिळविली. १८४९-१८५४ मध्ये फक्त वकिली केली. १८५४ मध्ये युनायटेड स्टेट्सच्या प्रतिनिधी सभेत निवडून आला व १८६१ साली राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. १८६४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निर्वाचन. ता. १४ एप्रिल १८६५ रोजी नाट्यगृहात खेळ पाहत असता जॉन बून नावाच्या

नटाने खून केला.'

वल्लभाचार्य (१४७९-१५३१) :-पुष्टीमार्गाचा संस्थापक. तेलगु प्रांतातील कांकरव येथील लक्ष्मणभट्ट नावाच्या कृष्णयजुर्वेदी तेलंगी ब्राह्मणाचा हा मुलगा. आईचे नाव एलमागार. वल्लभाने काही दिवस वृंदावनास व काही दिवस मथुरेस वस्ती केली. या सुमारास गोवर्धन पर्वतावर देवदमन (श्रीनाथजी) या नावाने गोपाळकृष्ण प्रगट झाले असे सांगतात. 'त्या ठिकाणी येऊन माझे दर्शन घे, ' असे वल्लभास स्वप्नात सांगितल्यावर तेथे जाऊन श्रीनाथजीचे दर्शन घेतले. नंतर वल्लभाने पुष्टिमार्गाची स्थापना केली व श्रीनाथजी या नावानी

प्रसिद्ध असलेल्या कृष्णाच्या विशिष्ट अवताराशी आपल्या पंथाची सांगड | घातली. वल्लभाच्या पूर्वीच्या काळी होऊन गेलेला ग्रंथाकार विष्णुस्वामिन्‌ याचा व वल्लभाचा वेदान्तविषयक सिद्धान्त एकच आहे. तो असा-आदिपुरुष अगर

आत्मा एकटा असल्यामुळे त्यास बरे वाटेना, नाना रुपे धारण करावी अशी त्यास इच्छा झाली, त्या प्रमाणे तो स्वतःच अचेतन सृष्टी, जीव (जीवत्मा) व अन्तर्यामिन

आत्मा झाला. “यथा सुदीप्तात्पावकाद्विष्फुलिङाः सहस्त्रशः प्रभवन्ते सरूपाः

तथा“ याप्रमाणे सर्व उत्पन्न झाले असून त्याचेच अंश होत. संस्कृत भाषेत अनेक

ग्रंथरचना. प्रमुख-वेदान्तसूत्र-अणूभाष्य, सुबोधिनी व तत्वदीप निबंध.

वाकसकर, विनायक सदाशिव :--बडोदे येथील प्रसिद्ध इतिहाससंशोधक, जातीने कायस्थ प्रभु. ' अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे ' वगैरे ग्रंथांचे लेखक.

वेदान्त :--उपनिषदांत सांगितलेले तत्वज्ञान ते वेदान्त. शंकराचार्यप्रणीत अद्वैतास वेदान्त म्हणून सर्वसामान्यतः संबोधितात. जीव व बह्म एक आहे, जग ' हा केवळ भास आहे असे अद्वैत सांगतो, तर मध्वाचार्यासारखे द्वैतवादी जीवात्मा | व परमात्मा भिन्न भानतात व जग सत्य आहे असे मांडतात. Yared वल्लभाचार्य जीव, जगत व परमात्मा यांचे ऐक्य मानून ब्रह्माला मायेची बाधा लागू देत नाहीत. विशिष्टाद्वैतवादी (उदा. रामानुजाचार्य) जीव, जगत्‌ व ईश्वर ही वेगवेगळी व खरी समजतात. जीव-जगतृईशवराचे शरीर आहे असे ते

कल्पितात.

१: गणवीर पु. ३५२.

डब्ल्यू-२०७३-३७ ब