व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 623

व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५७५

वैष्णवपंथ अथवा भागवत पंथ :--''हिंदुस्थानातील एक प्रमुख धर्मसंप्रदाय. विष्णुदेवतेला निरनिराळ्या स्वरुपात भजणारा हा संप्रदाय असल्यामुळे याला वैष्णवपंथ म्हणतात. ब्राह्मण काळी विष्णुदेवतेला विशेष प्राधान्य येत होते. पुढे महाभारतकाळी व पुराणकाळी विष्णु म्हणजेच परब्रह्म असे मानण्यात येऊ लागले. वैष्णव संप्रदाय हा मूळ भक्तिप्रधान एकेश्वरी धर्म Ba. हा एकान्तिक धर्म ईश्वराचे अस्तित्व मानणारा होता. या धर्माच्या बुडाशी वासुदेव कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता ही होती. कालांतराने या धर्माला सांप्रदायिक स्वरूप प्राप्त होऊन हा धर्म पांचरात्र अगर भागवत या नावाने संबोधण्यात येऊ लागला. वैष्णव संप्रदायात नारायणीय धर्मातील तत्त्वज्ञान, वासुदेव भक्ती व विष्णूची परब्रह्म या नात्याने उपासना, यांचा अंतर्भाव होऊ लागला. अभीर नावाच्या जातीने बालकुष्णाच्या लीला व गोपीशी होणारे त्याचे विलास या दोन गोष्टीची, या धर्मात भर पडली. श्रीशंकराचार्यानी आपल्या अद्वैत मताचा प्रसार हिंदुस्थानात केल्यावर या पंथाला धक्का बसला. पण पुढे रामानुजाचायाँनी वैष्णव धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याच सुमारास उत्तर भारतात निम्बार्कानेही वैष्णव संप्रदायाच्या पुनरुद्धार्थ कसून प्रयत्न केला.”

“या साधुसंतांचा पंथ भागवत किंवा वैष्णव पंथ म्हणून प्रसिद्धीला आला. भक्ती व समानता हा त्या पंथाचा मंत्र, तो मंत्र सफल करावयाचा तर शंकराचार्याची विचारप्रणाली खोडून काढली पाहिजे, असे ज्या भागवतांना वाटले त्यांत रामानुजाचार्य (शके ९३८) आणि मध्वाचार्य (शके १११९-११९८) हे पहिले होत. या दोघांच्या विचारसरणीचे लोण वल्लभाचार्य (शके १४०१-१४५३) यांनी पुढे नेले. भागवत धर्माची चळवळ पुढील काळात बहुजन समाजात पसरली. त्याचे श्रेय पुढील काळातील साधुसंतांना आहे. त्यातील प्रमुख साधुसंत रामानंद (१४ वे शतक), चैतन्य (इ. स. १४८५-१५३३), कबीर (१५ वे शतक), चोखामेळा, नामदेव, एकनाथ (१५३२-९९ इ. स.) तुळसीदास (१५३३-१६२४), गोरा कुंभार, सेना न्हावी, रविदास चांभार, नरसी मेहता, मीराबाई, नानक (१४६९-१५३९ इ. स.), तुकाराम हे होत. त्यांनी भागवत पंथाची भगवी पताका भारत देशाच्या निरनिराळ्या प्रदेशात नाचवली. संतांनी मानवातील विषमतेविरूद्ध म्हणजे जातिभेदाविरूद्ध जोराचे बंड उभारले व ते भक्तिमार्गातील सर्व आध्यात्मिक उपायांनी लढविले. परंतु जातीजातींतील भेद

१: गणवीर, पृ. २२४.