व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 624

पु७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मुळासकट नष्ट करण्याचे यश त्याना लाभले नाही. याचे कारण हिंदु धर्मातील पुनर्जन्म, मायावाद, अवतार, कर्मवाद, इत्यादी शिकवणुकीची जनतेवर पडलेली छाप. ही छाप साधुसंतांच्याही मनावर बसलेली होती. व तीमुळे ते जातिभेद नष्ट करण्याच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत.“

“भागवत धर्माच्या चळवळीतील साधुसंतांनी ब्राह्मणी हिंदू धर्माची स्तुती गावयाला सुरवात केली. वेदप्रामाण्य, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, ब्राह्मणेतरांचे हीनत्व, माया, पुनर्जन्म इत्यादी कल्पना यांचा त्यानी उदो-उदो केला. परमेश्वर एक, सर्व मानवप्राणी एक वगैरे समतेच्या कल्पना जरी ते चळवळीत प्रसृत करीत असत तरी ते चातुर्वर्ण्याला धक्का न लागू देता समाजसमता प्रस्थापित करण्यास उद्युक्त झाले होते. कथाकीर्तनात, अभंगात, भारुडात साधुसंत समतेच्या कल्पना सांगतात; पण प्रत्यक्ष आचरणात तो ब्राह्मण म्हणून श्रेष्ठ व तो महार म्हणून अस्पृश्य अशी त्यांची वागण्याची रीत होती. एवढेच नव्हे तर एखादा ब्राह्मणेतर साधू वा संत भक्तिमार्गात शिरोमणी जरी ठरला तरी तो अब्राह्मण जातीचा म्हणूनच त्याला वागविण्यात येई. चोखामेळा, रविदास, नंद, तिरुमल्लुवर, इत्यादी अस्पृश्य संतांची चरित्रे याच कथांनी भरलेली आहेत. परमेश्वर हा सर्व मानवांचा बाप, सर्व मानव ही त्याची मुले, सर्व मानव हे परस्परांचे बहीण-भाऊ अशी उदात्त शिकवण आपल्या अभंगांतून देणारे संत आपल्या अंभंगांत असेही मान्य करीत की, ब्राह्मण श्रेष्ठ व वंदनीय असेच मानले पाहिजेत; आणि ब्राह्मणेंतर कितीही थोर झाला तरी त्याला ब्राह्मणाने समानतेने वागवू नये, अशी रामदासांची शिकवण होती. ब्राह्मणांनी ब्राह्मणेतराला आपले गुरू करू नये असा अलिखित नियम होता व तो सर्व संत पाळीत असत.” * f

शंकराचाय (इ. स. ७८०-८१२) :--इ. स. ७८० मध्ये केरळ उर्फ मलबार प्रांतात नंबुद्री जातीच्या ब्राह्मण कुलात जन्म. वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे पालनपोषण त्यांच्या मातुश्रीने केले. अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर थोडक्याच अवधीत त्यांनी आपले अध्ययन संपविले व संन्यास घेण्याचा निश्चय करून विध्याद्रीच्या आसपास आले. तेथे त्यांनी सांख्यकारिकांवर भाष्य करणारे प्रसिद्ध पुरूष गौडापादाचार्य यांचे पट्टशिष्य गोविंदाचार्य यांचेपासून गुरुपदेश घेऊन संन्यास दीक्षा घेतली. नंतर तेथेच वेदाध्ययन करून ते काशीस गेले. |

अशा रीतीने सर्वत्र संचार करून वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी आपला अवतार समाप्त केला.

१: खैरमोडे, खंड १ ला, पृ. ११६, ११८.