- व्यक्ती, संस्था, कार्य - सूची ५७७
जनतेने त्यांना जगद्गुरू ही पदवी दिली. त्यांनी केलेली कामगिरी म्हणजे बौद्ध धर्माकडील जनतेच्या वृत्तीचा कल फिरवून त्यांची वैदिक धर्मावर निष्ठा बसबिणे ही होती. अद्वैतवादाचे पुरस्कर्ते. सर्व विश्वातील अंतिम सत्ता व सत्य ब्रह्म आहे ! जग हे ब्रह्माच्या तुलनेने मिथ्या व आभासात्मक आहे. जीवाचे मूळ स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे. त्यांच्यात अद्वैत आहे. ब्रह्म हे सतूचित् आनंदमय आहे. या ब्रह्मज्ञानाने मोक्षप्राप्ती
होते; `
शंकराचार्यांनी आपल्या मतांचा उपदेश अखंड चालू राहण्याची व्यवस्था दक्षिणेस श्रृंगेरी, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस पुरी व उत्तरेस बद्रिकेशवर येथे धर्मपीठांची स्थापना केली.
शंकराचार्य, डॉ. लिंगेश महाभागवत कुर्तकोटी (१८७९-१९६७) :--जन्म धारवाड जिल्ह्यातील कुर्तकोटी गावी, वतनदार कुळकर्णी घराण्यात. कर्नाटकातील पद्धतीप्रमाणे गावाचे नाव हेच आडनाव. म्हणून त्या नावाने प्रसिद्ध, संस्कृतचे पंडित व गाढे अभ्यासक. ' दि हार्ट ऑफ भगवद्गीता ' या प्रबंधावर ओरिअंटल युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनकडून पीएच.डी.. लो. टिळकांच्या सल्ल्यावरुन संन्यास. ३ जून १९१७ ला कोल्हापूरच्या संकेश्वर पीठावर शंकराचार्य म्हणून अभिषेक. संस्कृत, Root, मराठी व कानडी या भाषांवर प्रभुत्व, त्यामुळे अस्खलित वक्तृत्व. चतुर तसेच महत्वाकांक्षी. धर्मकारणापेक्षा राजकारणात लुडबूड करण्याची सवय. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुळकर्णी वतने जप्त केल्याच्या वादावरुन संकेश्वर पीठ सोडून नाशिक येथील पंचवटी येथे वास्तव्य. अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले. शुद्धिकरणासाठी खूप प्रयत्नशील राहिले. नाशिक येथेच समाधिस्थ झाले.
शिदनाक महार :--' सातारा जिल्ह्यात तासगाव तालुक्यात कळंबी म्हणून
एक गाव आहे, तेथला हा वतनदार महार. औरंगजेबाचे हातून संभाजी मारला
गेल्यावर पुढे जी महाराष्ट्रात बंडाळी माजली, ती २५-३० वर्षे चालूच होती. त्यावेळी शिदनाकाने महार लोकांचे एक पथक उभारून धामधूम केली. शाहूस जे लहानमोठे सरदार मिळाले त्यांत हा शिदनाकही मिळाला. शाहूस राज्यप्राप्ती झाल्यावर ज्यांनी त्यास मदत केली, त्या सर्वास त्याने त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या दिल्या. त्यावेळी शिदनाक ह्यास कळंबी गाव इनाम दिला. ह्या शिदनाकचा नातू त्याच्याच नावाचा होता, तो खड्यांच्या लढाईत होता. खर्ड्याच्या मैदानावर जेव्हा मराठ्यांच्या फौजेचा तळ पडला