व्यक्ती, संस्था, कार्य - सूची | ५८१,
सेन, केशवचन्द्र (१८३८-१८८४) :--बंगाली ब्राह्मणेतर जातीत जन्म......शेजारी राहणाऱ्या पंडित राजवल्लभ नावाच्या पंतोजीने दिलेल्या ब्राह्मसमाजासंबुंधीच्या पुस्तकाच्या परिणामाने १८५० साली ब्राह्मसमाजाची दीक्षा. ब्राह्म-समाजाचे प्रमुख देवेन्द्रनाथ ठाकूर यांच्याबरोबर विशेष सहवास. देवेन्द्रनाथांच्या अनुग्रहाने | १८६२ साली ब्राह्मसमाजाचे आचार्य व ब्रह्मानंद ही पदवी. देवेन्द्रनाथ जुन्या आचाराविचाराचे, जातीभेद, जानंवे वगैरे पांळणारे म्हणून मतभेद होऊन नवब्राह्मसमाजाची स्थापना. इंग्लंडात जाऊन आल्यावर समाजसुधारणेकरिता अनेक संस्था स्थापन केल्या. सुधारणावादी केशवचंद्रांनी आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह सुमारे १६ वर्षाच्या कुचबिहाराच्या महाराजाशी केला तेव्हा मात्र त्यांच्या समाजात त्यांच्यावर खूप टीका झाली. खिस्ती, मुसलमान, . पारशी व हिंदु या सर्वांना एकत्र आणणारा ' नवविधानध्वजारोपण “ नावाचा संस्कार सुरू केला होता. त्यात खिस्ती संस्कार जास्त होते. .
सोशल सर्व्हिस लीग :--नारायण मल्हार जोशी, कामगार नेते, यांनी १९११ च्या मार्च महिन्यात सर नारायण चंदावरकर, डॉ. भालचंद्र भाटवडेकर, कृष्णलाल जव्हेरी, बी. एन्. मोतीवाला, जी. के. पारेख व टी. ओ. कुळकर्णी ह्यांच्या प्रोत्साहनाने व सहकार्याने कामगारांची आर्थिक परिस्थिती, त्यांची राहणी, त्यांचे आरोग्य, त्यांचे व त्यांच्या मुलांचे शिक्षण ह्यांची पाहणी करून त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी ' सोशल सर्व्हिस लीग ' ह्या संस्थेची स्थापना
मुंबईत केली.
सोळंकी, डॉ. पुरुषोत्तम गोविदजी :--मुंबईत दि. १९-१२-१८७६ ला जन्म. वडील व्यापारी म्हणून आर्थिक स्थिती बरी. एल्. अँण्ड एम्. एस्. ची परीक्षा पास करून मुंबईत प्रॅक्टीस सुरू केली. स्पृश्य समाजातून एकही पेशंट मिळाला नाही. सौराष्ट्र व गुजरात येथील छोट्या मोठ्या संस्थानात नोकरीस लागले. जात ' रजपूत ' असल्याचा बहाणा करावा लागला. अस्पृश्य असल्याचे BIS होताच मुंबईला पुन्हा परत. डॉक्टरकीची प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी हिंदू धर्म सोडून मुसलमान किंवा खिस्ती धर्माचा स्वीकार योग्य असा निर्णय घेतला. एका अमेरिकन मिशनऱ्याच्या भेटीमुळे खिस्ती धर्म स्वीकारण्याचे निश्चित होऊन सेंट अँड्र्यूज चर्च, आग्रीपाडा येथे त्यांनी दि. ११-४-१९२५ ला बाप्तिस्मा घेतला. प्रांतिक कौन्सिलात सरकार नियुक्त सभासद म्हणून नेमल्याची घोषणा १९२६ च्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केली गेली होती. त्यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नियुक्त केले गेले होते.