व्यक्ती, संस्था, कार्य-सूची - Page 630

५८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदु महासभा :- मुस्लिम संघाच्या स्थापनेनंतर, प्रतिक्रिया म्हणून हिंदु सभेचा जन्म झाला. १९०९ साली पंजाबमध्ये, मुसलमानांच्या दंग्यांना तोंड देण्यासाठी व हिंदूंना समर्थ करण्यासाठी, पहिली प्रांतीय परिषद भरून तिच्यातून पंजाब हिंदुसभेचा जन्म झाला. हळुहळु इतर प्रांतातही तिच्या विचारसरणीचा प्रसार होऊ लागला. १९१५ साली हरद्वार येथे अखिल भारतीय हिंदु महासभेचे पहिले अधिवेशन भरले. *' अखिल हिंदू समाज एकजीव करण्यासाठी त्यातील सर्व अंगोपांगांना सुसंघटित करणे आणि हिंदू व इतर जाती यांच्यामध्ये सद्भावना उत्पन्न करून त्यांच्याशी faa वागणे “ हे हिंदु महासभेचे ध्येय होते. रााष्ट्रसमेच्या मंडपात हिंदुमहासभेची अधिवेशने भरत आणि राष्ट्रसभेचे मोठमोठे हिंदू व मुसलमान पुढारी त्यांना हजरही राहात. लाला लजपतराय, पंडित मदनभोहन मालवीय इ. अव्वल दर्जाचे पुढारी उत्साहाने भाग घेत.