मसलमान ब्राह्मण झाले ! - Page 63

मुसलमान ब्राह्मण झाले !

मिरत शहरीं ता. २०-१-१९२० रोजीं अटकेंतून सुटलेल्या अल्ली बंधूंचे मुसलमान वर्गातर्फे स्वागत करण्यांत आलें. मयूरासनावर बसवून खिलाफत कमिटी माफत उभय बंधूंना मानपत्र दिल्यानंतर बराफखाना मैदानावर लो. रायसाहेब पंडित सीताराम यांच्या अध्यक्षतेखालीं हिंदुमुसलमानांची जंगी जाहीरसभा भरली होती, व त्या ठिकाणीं लो. लाला ज्योतिप्रसाद यांनीं हिंदुंतर्फ दिले जाणारें मानपत्र वाचून दाखविलें. अशा तर्‍हेनें व्यक्त केलेली हिंदुमुसलमानांमधील एकी जेवढी वाढेल तेवढी थोडीच आहे. परंतु या एकीचे पर्यवसान सहभोजनांत होईल असें कोणासहि वाटणें शक्य नव्हतें. तथापि अशक्य तें शक्य झालें आहे. या सभेंची हकीगत देताना क्रॉनिकल पत्राच्या खास बातमीदारानें असा संदेश पाठविला आहे कीं, अल्लीबंधूंच्या स्वागतप्रसंगी मिरत येथील रहिवाशी लो. लाला बुद्धप्रकाश या हिंदू गृहस्थाच्या घरीं हिंदु-मुसलमान पाहुणेमंडळी ताटास ताट लावून जेवली | एकाच्या ताटास दुसऱ्यानें ताट लावून जेवण्यास दोघेही एकाच जातीचे असणें हिंदूधर्माला आवश्यक आहे. सहभोजनास जरूर असलेलें एकजातीयत्व saya करण्यास हिंदू मुसलमान झाले की मुसलमान हिंदु झाले हा एक प्रश्‍नच आहे. मुसलमानांना कोणाहि परोबर सहभोजन करण्यास त्यांच्या धर्माची हरकत नसते. पण ज्या अर्थी हिंदूंना

हरकत आहे त्या अर्थी मुसलमानांचे हिंदु केले असें म्हणणें भाग पडतें. हें कसें

घडलें हें एक कोडेंच आहे. कारण हिंदू म्हणविण्यास हिदू म्हणविणाऱ्यांच्या पोटींच आल्याखेरीज गत्यंतर नसतें. कदाचित्‌ बकरीदच्या दिवशी गोवध करणार नाहीं-खाणार नाहीं, नव्हे, असा ठराव मॉसलेम लीगने गेल्या बैठकीत पास केल्यामुळे ते हिंदू गणले गेले असतील. पण मुसलमान हिंदू झाले येवळ्यानें परिस्थितीचा खरा भावार्थ उघड होत नाही. केवळ हिंदू या धर्माच्या छत्राखालीं आल्यानें सहमोजनाचा मार्ग खुला होत नाही, सहभोजन करणारांत एकजातीयत्व असावें लागतें. मुसलमान हिंदू झाले तर त्यांची जात कोणती हैं त्यांच्या पंक्तीस बसणाऱ्यांच्या जातीवरून ठरवितां येईल. वरील बातमीदारानें सहभोजनप्रसंगी कोणकोणत्या जातीचे हिंदू होते हें जरी दिले नाही तरी ते वरिष्ठ वर्गातील हिंदू होते असा अंदाज काढल्यास तो खोटा ठरणार नाहीं. परंतु तो खोटा आहे असा जरी आक्षेप घेतला तरी मुसलमान ब्राह्मण झाले असें म्हणण्यास कोणाचीच हरकत