२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पडणार नाहीं. कारण ब्राह्मणाबरोबर भोजन कोणत्याही जातीतींल हिंदू मोठ्या आतुरतेने करील हें खास. मुसलमान ब्राह्मणांच्या पंक्तीस बसले म्हणून वाईट वाटण्याइतकें धर्मवेड आमच्यांत नाहीं. पण तें पाहून पोट दुखण्याइतकी माणुसकी मात्र आमच्यांत आहे. आणि म्हणूनच घरच्यास सोडून बाहेरच्यास मिठी मारल्याचें आम्हांस वाटतें. हिंदूत गणलेल्या सहा कोटी बहिष्कृत समाजाशीं सहभोजन न करतां ब्राह्मणांनी बिनबोभाट परधर्मीयांच्या पंक्तीस बसावें हा केवढा अधमपणा ? याचें मूळ शोधून पहातां असा अधमपणा कसा घडतो हें कळेल. हा जिव्हाळ्याचा प्रश्न खास नव्हे, कारण मुसलमानांना जसे ते येवढे जिव्हाळ्याचे लेखूं लागले आहेत तसेंच ते बहिष्कृतांस परधर्मीय आहेत असें म्हणूं देत नाहींत. १९१० सालच्या खानेसुमारीचे वेळीं मुसलमान बंधुंच्या सूचनेवरून--आणि ती सूचना गैर नव्हती-बहिष्कृत लोकांस हिंदूस सर्वसाधारण असलेले कोणतेच हक्क नसल्यामुळें हिंदू या सदरांत घालूं नयें, असें घाटत होतें. त्या वेळीं बहिष्कृत लोकहि हिंदू आहेत असें मोठ्या कंठरवानें सांगण्यांत आलें. परंतु बहिष्कृत हिंदु आहेत असे म्हणणारांनी याच वर्गातील सुप्रसिद्ध क्रिकेटपटु रा. बाळू बावाजी पालवणकर यांच्याबरोबर कांहीं वर्षापूर्वी मुंबईच्या आर्यन ब्रदरहूडच्या वार्षिक मेळाव्यांत सहभोजन केल्यामुळें धर्म बुडाला म्हणून केलेल्या कोल्हेकुईचा प्रतिध्वनि अजून मावळला नाहीं. जसें त्या प्रसंगी तसेंच या प्रसंगीं “बीजी बात नहीं ज्ञातने व्हार “ असें कर्मठांच्या तोंडून आलें नाहीं याचा अर्थ सहज कळण्यासारखा आहे. एका धर्माच्या छत्राखाली असणाऱ्या, ज्यांना वैदिक धर्म शिरसावंद्य आहे, जे अनादिकालापासून हिंदुस्थानचे रहिवाशी आहेत अशा बहिष्कृत समाजाबरोबर सहभोजन न करतां, धर्मनिष्ठ अशा हिंदूंनी न नीचो यवनात्परम् “न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठ गतैरपि“ एवढा ज्या महमदीयांविषयी त्यांना तिरस्कार होता तो सर्व विसरून जाऊन त्यांच्याशीं
Hien दिलजमाईच्या मुळाशीं मुसलमानांच्या पंक्तीला बसून धर्म बुडत नाहीं
असें नाहीं ; पण न बुडवुन चालत नाहीं. पंक्तीला बसा, धर्म बुडवा, पण एक व्हा आणि स्वराज्य मागा अशी ब्राह्मणलोक आजकाल मुसलमानांची प्रार्थना करीत आहेत. कारण मुसलमानांनीं जर स्वराज्य हिंदूंचे राज्य होईल अशा सबबीवर नको म्हटलें तर खरोखर स्वराज्य हातचें जाईल, असा त्यांना धाक वाटतो. एकीच्या प्रीत्यर्थ सहभोजनासारखा जिव्हाळा उत्पन्न करणाऱ्या मार्गाच्या आड येणाऱ्या अनिष्ट आचारांची आहुति देणें श्रेयस्कर आहे असें BIT ठाम मत आहे. परंतु धर्म बुडवून मुसलमानांशीं ऐक्य करण्यास झटणाऱ्या हिंदुंनीं आपल्या बहिष्कृत धर्मभाईशीं ऐक्य करण्यास धर्माची आडकाठी आणावी यांत असलेलें मर्म “नाक दाबल्याखेरीज तोंड उघडत नाहीं” या म्हणींत सांठलें आहे हें उघड