मुसलमान ब्राह्मण झाले ! २१
आहे. मुसलमानांशीं एकी न केली तर स्वराज्य मिळणें अशक्य आहे. पण बहिष्कृतांशीं सहकार्य न करितां जर स्वराज्य मिळविण्यास बाध येत नाहीं तर वरिष्ठ हिंदूंनी तरी त्यांच्याशीं ऐक्य करण्याच्या भानगडींत कां पडावें ? सहकारितेचें जहर प्यावयास लावल्याखेरीज ते पिणार नाहींत. पण एवढा धाक घालण्यास बहिष्कृतांनीं संघशक्ति उत्पन्न करावयास नको काय ? संघशक्तीवाचून बहिष्कृत लोक ब्राह्मण व्हावयाचें नाहींत.
विविध विचार : मूकनायक, ता. १४ फेब्रुवारी १९२०.