हें स्वराज्य नव्हे, हें तर आमच्यावर राज्य! २३
आहे तरी या हिंदी जनांच्या व्यवहारांत बऱ्याच गोष्टी चक्रपाणीच्या हातीं नसून त्याच्या दलालांच्या हातांत आहेत याचा आम्हास विसर पडणें शक्य नाहीं. म्हणूनच स्वराज्याचे व्यावहारिक रूपांतर काय होईल हे पहाणें इष्ट आहे.
हिंदुस्थानदेश इतर देशांच्या मानानें दरिद्री आहे याबद्दल मुळींच मतभेद नाहीं. वार्षिक सरासरी उत्पन्नाच्या दृष्टीनें पाहिलें असतां हिंदुस्थानदेशाची सांपत्तिक स्थिति खरोखरच शोचनीय आहे. बेल्ज्यम, डेनमार्क, फ्रान्स, जर्मनी, इटाली, स्वीडन, स्पेन, स्वित्झर्लंड, ग्रेटब्रिटन व अमेरिकन संयुक्त संस्थानांतील दरमाणसीं सरासरी वार्षिक उत्पन्नाचे लढाईपूर्वीचे आंकडे अनुक्रमें २८, ३२, २७, ३१, १२, २२, १६, १९, ३९, ४० पौंड आहेत. परंतु हिंदुस्थानसारख्या दाट वस्तीच्या देशांत दर माणसीं प्रमाण दोन पौंड पडतें. यावरून या देशाची सांपत्तिक स्थिति किती हलाखिची आहे हें निराळे सांगणें नको. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी हिंदुस्थान देशाचा सांपत्तिक दर्जा इतर राष्ट्रांच्या मानानें अव्वल नंबरचा होता. परंतु ब्रिटिश लोकांच्या विघातक व्यापारी धोरणामुळे अखेरचा आला आहे असें म्हणणारा एक पक्ष आहे. परंतु त्या पक्षाशी झगडा करीत बसण्यांत अर्थ नाही. आर्थिक उन्नतीच्या राजमार्गाचा ऊहापोह करण्याचेंहि हें स्थळ नव्हे. स्वराज्याच्या अमदानींत दारिद्र्य नाहींसें करणाऱ्या स्वराज्यवादीयांनीं आंखलेल्या मार्गाची इष्टानिष्टता ठरविणें एवढेंच आजचें कर्तव्य आहे.
स्वराज्यवादीयांच्या मतें हिंदुस्थानच्या दारिद्र्याच्या मुळाशीं हिंदुस्थानास लागू केलेली अनियंत्रित व्यापारपद्धतिच आहे. व्यापारपद्धति नियंत्रित करणें हा हिंदुस्थानचे दारिद्र्य घालविण्याचा त्यांचा मुख्य मार्ग आहे, असें म्हटल्यास कोणी आक्षेप घेणार नाहीं. हा मार्ग भावतो कां भोंवतो याचा निर्णय अर्थशास्त्राच्या सिद्धांताच्याच आधारानें केला पाहिजे. जे जिन्नस आपल्याला अगदीं अल्प मोलानें तयार करण्यासारखे आहेत तेच दरेक राष्ट्राने तयार करावे व ते इतर राष्ट्रांस विकून त्यांपासून आपणास लागणारे, पण स्वदेशीं अल्प मोलानें तयार न करितां येण्यासारखे जिन्नस विकत घेण्यांत सर्व राष्ट्रांचा फायदा आहे, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत सर्वसम्मत आहे. राष्ट्रातील परस्पर व्यापाराची उभारणी याच व्यवहारसिद्ध तत्त्वावर आहे. एका देशांत उत्पन्न होणारा माल दुसऱ्या देशांत निर्गत होतो याचें कारण हेंच कीं पहिल्या देशाला दुसऱया देशापेक्षां तो कमी मोलानें तयार करितां येतो. त्याच प्रमाणें एका देशांत उत्पन्न होणारा माल दुसऱ्या देशांत आयात होतो याचें कारण हेंच, कीं, दुसऱ्या देशाला तोच माल पहिल्या देशापेक्षां कमी भावानें किंवा त्याच भावानें तयार करितां येत नाही. म्हणूनच स्वल्प मोलानें उत्पन्न होऊं शकणारा माल उत्पन्न करून