हें स्वराज्य नव्हे, हें तर आमच्यावर राज्य ! २५
स्वराज्यवादियांच्या एका भाकिताची फलश्रुति काय होईल याचा येथवर विचार झाला. आतां त्यांच्या दुसऱ्या भाकिताची फलश्रुति काय होईल हें पाहूं.
ब्रिटिश राज्यकारभारांतील दुसऱ्या दोषाचें विवेचन करतांना स्वराज्यवादी असा आधार देतात कीं, ज्या ज्या परिस्थितींत एका वर्गाचें किंवा व्यक्तीचें वर्चस्व इतर वर्गावर किंवा व्यक्तींवर स्थापित होतें ती ती परिस्थिति उभयांस अनर्थकारकच होते. ज्यांच्यावर अशा wed वर्चस्व स्थापन होतें त्यांत स्वामित्व आलेल्या लोकांना राजे, लोकपाल, लोकनियंते, प्रजापति, भूदेव, ईश्वरांश, ईश्वरावतार, काल कारण, न्यायमूर्ति, सद्गुणनिधान, कृपासागर अशीं विशेषणें लावण्याचा प्रघात पडतो. उलट पक्षी स्वामित्वाखाली आलेल्या लोकांना स्वतःस हीन, पतित, आज्ञाधारक, सेवक, किंकर अशीं विशेषणें लावून घेण्याची संवय लागते. अशा रीतीनें पराधीन झाल्यामुळें सत्ताधारी वागवतील तसें वागण्यांतच धर्म आहे अशी त्यांची दृढ समजूत होते. या पूज्य बुद्धीचीं बीजें पिढ्यानुपिढ्या होत गेलेल्या संगोपनानें मनांत बिंबल्यामुळें इतकीं बलवत्तर होतात कीं, पुढें ज्यांना पूज्य मानण्याची मनाला सवय लागली ते त्या पूज्यतेस जरी अपात्र असले तरी त्यांचा अवमान किंवा धिक्कार करण्यास मन धजत नाही. तशाच प्रकारें वर्चस्वमंडित लोकांना आपलीं स्तुतिस्तोत्रें ऐकण्याची संवय लागते, व आपण स्तुतिपात्र आहों ही भावना तिच्या पिढ्यानुपिढ्या होत गेलेल्या संगोपनानें इतकी दृढ होते कीं, अंगी कोणत्याही प्रकारचा प्रशंसनीय गुण नसतांहि आपण परमपूज्य आहों असें वाटून लोक जर वंदूं लागले नाहींत तर त्यांस दंडून वंदावयास लावण्याचा प्रयत्न करितात. अशा परिस्थितींत वरच्यांत जसा दुरभिमान उत्पन्न होतो तसाच खालच्यांचा स्वाभिमानहि नष्ट होतो. वरच्यांस ज्याप्रमाणें आज्ञा देणें हेंच कर्तव्य वाटतें त्याचप्रमाणें खालच्यांस आज्ञापालनांतच आपली इतिकर्तव्यता आहे असें वाटतें. अशा परिस्थितीमुळें वरच्यांच्या मनोभूमिकेत काठिण्य येतें व खालच्यांची मनोभूमिका निस्तेज होऊन त्यांची आपण होऊन कांही करण्याची धमक जागच्या जागींच विरून जाते. जेथें जेथें म्हणून उच्चनीच असे स्थितिजन्य तट पडतात तेथें तेथें उच्च लोकांच्या मानसिक दास्यांत खितपत पडलेल्या मीच लोकांत व्यक्तिविकास होणें शक्य नसतें. कै. गोखले यांनीं व्यक्त केलेला ब्रिटिश राज्यकारभारातील नव्हे तर कारभारानुषंगिक असलेला जो दुसरा दोष त्याला याचाच आधार घेतला होता. त्यांच्या मतें परकीय राज्यकारभाराच्या
Ga होणारें नुकसान जरी अक्षम्य ह्मणून बाजूस ठेविलें तरी परकीय
राज्यकारभारानें होणारें नैतिक नुकसान अक्षम्य आहे. परकीयांच्या वर्चस्वामुळें हिंदी जनांचा मानसमोड ठेंगणा होत चालला आहे. आपण कमदर्ज्याचे आहोंत