हें स्वराज्य नव्हे, हे तर आमच्यावर राज्य ! - Page 72

२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

राज्य मिळवून देण्यास आपले प्राण खर्ची घातले त्याच खात्यांतून त्यांचा कशामुळे उठावा झाला हें त्यांना कळून चुकलें आहे. शिकल्यासवरल्यासहि जात लपवल्याखेरीज किंवा धर्मांतर केल्याखेरीज हा नोकरीचा सर्वसाधारण हक्क या बहिष्कृत लोकांस उपभोगितां येत नाहीं. खाजगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क इंग्रजी कायद्यांत आहें; पण मनूच्या द्वाहीमुळे जर मालमत्ता मिळवितां येत नाहीं तर त्यांनीं बाळगावें काय ? अखंड दारिद्र्य ! असें असूनहि तिकडे दुर्लक्ष्य करणाऱ्यांना किंवा आहे तें वाईट नाहीं असा उपमर्द करूं पहाणाऱ्या हिंदूंना '' शाठ्यं प्रति लाठ्यं “ हा लोकमान्य भोपटकरांचा न्याय लागू केल्यास गैर होईल काय ?

या बहिष्कृत लोकांचा स्वकीयांकडून होत असलेला उपमर्द जितका दुःसह व

aera आहे तितकाच ब्रिटिश राज्यपद्धतीचा कल चुकीचा व शोचनीय

आहे. " जाति व रूढि यांच्यावर कायद्याचा पगडा बसविण्यास कायदे करणारी मंडळी आपल्या स्वाभाविक मर्यादेच्या आंत असली पाहिजे, व त्या मर्यादेचे उल्लंघन करून समाजाच्या मतांशी तिनें प्रत्यक्ष रीतींने विरोध करितां कामा नये “ हा सर्वसाधारण नियम सरकारनें आपल्या ता. ८ आक्टोबर १८८६ च्या ठरावांत स्वतःस बंधनकारक म्हणून जाहीर केला आहे. याचा उघड अर्थ असा कीं, सामाजिक व धार्मिक बाबतींत जरी अन्याय होत असला तरी त्याच्या निवारणार्थ सरकार आपली सत्ता खर्ची घालणार नाहीं. म्हणजे आहे तें सामाजिक दडपण अबाधित चालू रहाण्यास परवानाच झाला म्हणावयाचा. कारण कांही बाबतींत राजदंड लाविल्याशिवाय सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणें दुरापास्त आहे, आणि म्हणूनच बहिष्कृतांना या राजदंडास “ असून अडथळा व नसून खोळंबा “ असेच म्हणावे लागतें. उलट आपल्या हातीं असलेला हा दंड स्वराज्याच्या देणगीनें आपल्या खालच्यास बाधक होत असलेला आपला पगडा न डळमळू देतां आपल्याला मात्र जाचक होत असलेला इंग्रजांचा कांटा काढून टाकणें हाच काय तो ज्यांचा हेतु अशांच्या हातीं दिला आहे ! याचा सारांश, स्वराज्य म्हणजे आमच्यावर राज्य होणार ! इंग्रजी राज्यांत ज्यांची बात सहन होत नव्हती त्यांची लात सोसावी लागणार ! स्वकीयांच्या सामाजिक, आर्थिक व धार्मिक जुलुमाच्या आड घातलेले इंग्रजी सत्तेचे सुदर्शन लोपून स्वराज्याच्या वजाचा आमच्यावर प्रत्यक्ष आघात होण्याची वेळ येणार | म्हणूनच आम्ही म्हणतों कीं, द्याल तर असें स्वराज्य द्या कीं त्यांत थोडेंबहुत आमचेंहि राज्य आहे.

eco

अग्रलेख : मूकनायक, ता. २८ फेब्रुवारी १९२०.