टोणगे पान्हवतील काय ? - Page 73

टोणगे पान्हवतील काय ?

“न जें प्रिय, सदोष “ हा राजकारणाच्या चढाओढींतील पक्षकारांच्या उन्नतीचा एक राजमार्गच होऊन बसला आहे. विरुद्ध पक्ष हा नेहमीं अप्रिय असावयाचाच, व त्याची नाचक्की करून आपला बोलबाला वाढविण्यास त्यांच्यांतील दोष दृष्टोत्पत्तीस आणणें हा पक्षकारांचा नित्यनेम उद्योगच म्हणावयाचा. केव्हां केव्हां तर पक्षकारांत नसते दोष प्रतिपक्षाच्या अंगीं लावून त्याचें चांगले स्वरुप बीभत्स आहे असें दर्शविण्याची प्रवृत्ति-नव्हे कृतीहि-होते. याचें उदाहरण पाहिजे असल्यास ब्रिटिश राज्यपद्धतीचें राष्ट्रभक्तांकडून होत असलेलें छिद्रान्वेषण बस्स आहे. ब्रिटिश राज्यांत होत असलेल्या शिक्षणाच्या हेळसांडीचा आधार घेऊन त्याच्यावर राष्ट्रभक्तांनीं कसें तोंडसुख घेतले हें नव्यानें सांगावयास नको. जेथें जेथें म्हणून स्वराज्य आहे तेथें तेथें प्रजेला साक्षर करण्याच्या हेतूनें प्राथमिक शिक्षण सक्तीचें व मोफत करण्यांत आलें आहे, म्हणून हिंदी प्रजा साक्षर करणें असेल तर स्वराज्य मिळविल्याखेरीज गत्यंतर नाहीं असें ठासून सांगितलेलें वाचकांच्या कानांवर आलें असेलच. १९१० सालीं कायदे कौन्सिलांत प्राथमिक शिक्षण सक्तीचें करणारें एक बिल आणलें होतें. बिलाचे पुरस्कर्ते कै. गोखले यांचा हेतु जरी प्रामाणिकपणाचा होता तरी त्यांना दुजोरा देणारे जहाल राष्ट्रभक्त अप्रामाणिकच होते असें आतां बालंबाल सिद्ध झालें आहे. या राष्ट्रीय भक्तांना सक्तीचें शिक्षण मान्य नसतां केवळ लोकांना पाहिजे आहे व सरकार सवड नाहीं म्हणून करणार नाहीं व न झाल्यानें जनता निराश होऊन सरकारबद्दल अप्रीति वाढेल व स्वराज्य सुलभ होईल या धोरणानुसारच त्यांनीं सक्तीच्या शिक्षणाची तळी उचलून धरली असावी. नाहीं तर ज्यांना प्रामाणिकपणे सक्ती पाहिजे आहे त्यांनी आपल्या हातीं सत्ता आल्याबरोबर तसें केलें असतें. कदाचित्‌ सरकारनें सक्तीचे शिक्षण नाकारल्याबद्दल उसन्या कळकळीच्या आवेशांत वाहिलेल्या लाखोलीच्या भरांत सक्ती करण्याची संधि आली असतां आपल्याला एक तर नको असतां करावी लागेल किंवा आपलें बहिरंग जाऊन आपली बदमाषी व्यक्त होऊन

आपण जनतेचे मित्र नसून तिचे हितशत्रु आहों हैं स्पष्ट झाल्यावर आपल्या तोंडाला

काळोखी लागेल या भवितव्यतेचा त्यांना विसर पडला असावा. पण देव तरी त्यांची परीक्षाच घ्यावयाला बसला आहे ना! करावें काय? ज्यांना जें अंतर्यामापासून नको होतें त्यांच्याच हातून तो तें करावयास लावितो, अशा त्याच्या