टोणगे पान्हवतील काय ? - Page 75

टोणगे पान्हवतील काय ? ३१

बाबतींत होत असलेला खर्च काढून शिक्षणाच्या पाठी लावा. जें उपदेशीत होतां तेंच करा. मग हरकत काय उरली ? केसरीकारांचे मात्र यानें समाधान होईल असें दिसत नांही. कारण त्यांना स्त्रीशिक्षणच नको आहे. पैसा नाहीं ही केवळ सबब आहे. म्हणूनच पैशाच्या प्रश्‍नाची त्यांनीं फारसी वाटाघाट केली नाही. पुणें म्युनिसिपल कमिटींतील एकंदर ३९ सभासदांपैकी लोकनियुक्त सभासदांची संख्या २६ आहे. या २६ पैकीं गेल्या बैठकींत गैरहजर राहिलेले ४ सभासद वजा जातां उरलेल्या २२ पैकीं १६ सभासद मुलींच्या शिक्षणाविरुद्ध आहेत. लोकप्रतिनिधीचें मत तेंच लोकमत हें खरें असेल तर पुण्यांतील सर्व लोकमत राष्ट्रीयपक्षाचें आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे असें केसरीकारानें मोठ्या दिमाखानें सांगितलें आहे. " तेव्हा लोकप्रतिनिधि “ हे जर लोकमताचे खरे आदर्श नसतील तर ' त्वमेव शरणं मम ' म्हणून कलियुगांतील कारभाराचा राजा जो मतदार त्याच्याकडे जाऊन या गोष्टीचा अखेर निकाल लावून घ्या असें राजकारणांत निष्णात असलेल्या केसरीकाराचा सल्ला आहे. हा जाडा व पोक्त सल्ला किती मानभावी आहे याची फोड करणें जरुर आहे. खर्चाचे ओझें नुसत्या मतदारावर नाहीं. अप्रत्यक्ष रीतीनें म्युनिसिपालिटीचा कर भरून ज्यांना मतदारीचा हक्क नाहीं असे कितीतरी लोक केसरीच्या सोवळ्या गांवांत असतील. मग मतदारांनाच विचारा म्हणतां तें कां ? त्यांत कांहीतरी अर्थ साधावयाचा असावा म्हणून. मुलांच्या सक्तीच्या शिक्षणाला कबूल नसणारे मतदार मुलींच्या शिक्षणाला कबूल होतील हें मुळींच संभवत नाहीं. मागासलेले व बहिष्कृत लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कर देतात. पण शिक्षण घेणाऱ्यांत वरिष्ठ वर्गातील मुलांचाच भरणा असतो म्हणूनच लो. कवडेशास्त्री [म्हणतात ] [कीं, ] [सक्ती ] कशाला ? दुसऱ्याच्या जिवावर आपली चैन होतेच आहे, शिक्षणाच्या [बाबतींत ] आपल्या हिताची परमावधी झालीच आहे, मग वाढता कर देऊन [मागासलेल्या ] [व ] बहिष्कृत वर्गांची मुलें साक्षर करण्यांत काय पुरुषार्थ? पदरच्या पैशाने पाजविलेली सुरी आपल्या प्रतिपक्षाच्या हातीं [देण्यास ] [त्यांचें ] [मन ] [धजत ] [नाहीं ] [; ] [पण ] करतील काय ? आजवर कृष्णाचें संगोपन करणारे [वसुदेव ] [आम्हीच ] [आहोंत-इंग्रज ] नव्हत-असें भासवून पाळण्याच्या दोऱ्या हातांत घेतल्यानंतर जर [कां ] [त्याची ] [दाद ] घेतली नाहीं तर या बहिरंग वसुदेवाच्या आंत बसत [असलेलें ] [कंसाचे ] [अंतरंग ] [दिसून ]

आपली फजिती होईल म्हणून मुलांच्या [शिक्षणास ] [ते ] [कबूल ] [झाले, ] [पण ] [मुलींच्या ]

शिक्षणाला कबूल होण्याइतकी पुण्याई त्यांच्यांत [नाहीं. ] वरिष्ठादि हिंदुंचे धार्मिक आचारविचार, कोत्या समजुती, खुळचट व [नादान ] [संस्कार ] [इत्यादिकांची ] [जिवापाड ] जोपासना जर कोणी करीत असेल [तर ] [तो ] [त्यांच्यांतील ] [se ] [स्त्रीवर्गच ] होय. त्या स्त्रीवर्गास साक्षर करून आपल्या [धार्मिक ] [वर्चस्वाच्या ] [इमारतीच्या ]