३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आधारस्तंभास कीड लावून घेण्यास हे मतदार टोणगे पान्हावतील हें कदापि होणें नाहीं, हें ओळखूनच ही मतलबी सूचना केसरीनें केली असावी. नाहीं तर मुलामुलींत सावत्रभाव दाखवणाऱ्या आपल्या म्हातारीस फांशी देण्याची पाळी आली असतां तिला फांशीं द्या असें म्हणण्याऱ्या न्यायाधिशाचा जाणूनबुजून सल्ला घ्या असें आव्हान करण्याइतका भोळा केसरी नाहीं हें खास.
विविध-विचार : मूकनायक, शनिवार, ता. २८ फेब्रुवारी १९२०.