यांचा ब्राह्मणवर्ण असावा खास - Page 77

१०

यांचा ब्राह्वाणवर्ण असावा खास

गेल्या दोन-तीन वर्षांत ब्रह्मवृंदांवर एक मोठी आपत्तीच ओढवली होती असें म्हणावें लागतें. अखिल जगाच्या-ब्रह्मवृंदांच्या नव्हे-रक्‍तानें पृथ्वीतलावर नुकताच लिहून ठेवलेल्या स्वय॑निर्णयाच्या कायद्याच्या आधारावर हिंदुस्थानावर असलेली इंग्रजी सत्ता बेकायदेशीर आहे अशी फिर्याद ब्रिटीश जनतेपुढें घेऊन जाण्याचा ब्रह्मवृंदानें निर्धार केला. एके प्रकारें न्यायप्रिय, समताप्रिय, स्वातंत्र्यप्रिय,

व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वासाठी ford तन मन धन खर्ची घातलें अशी ब्रिटिश जनता

या फिर्यादीचा निकाल आपल्या विरुद्ध देणार नाहीं असें ब्रह्मवृंदांना वाटे. पण मधून-मधून त्यांचें मन्‌ त्यांनां खात असे. ६ कोट प्रजा, तीहि एकधार्मियत्वाच्या व एकदेशीयत्वाच्या सुतांत गोवलेली ! आपल्या वर्चस्वानें अशा जिव्हाळ्याच्या लोकांच्या माना मुरगाळून आपण गब्बर झालों ! त्यांना मानसिक, सामाजिक, धार्मिक गुलामगिरीत हजारों वर्ष ठेविलें ! नव्हे त्यांची उन्नति करणारांस विरोध केला. इंग्रज आले म्हणून बरें, नाहीं तर त्यांचे हाल कुत्र्याने Ger नसते ! अशा आपण स्वय॑निर्णयाची फिर्याद घेऊन जाणें म्हणजे '' अहिंसा परमो धर्मः ““ असें फर्माविणाऱ्या बुद्धासमोर खाटकानें, माझ्या गायी चोरुन नेल्या त्या परत आणून देण्यास लावा, असे म्हणण्यासारखेंच आहे ! ज्यांच्या माना तुम्ही मुरगाळीत होतां त्यांच्या माना मुरगाळण्याच्या आड इंग्रजी सत्ता येते म्हणूनच तुम्हास ती नको असें जर ब्रिटीश लोकांनी आपणास विचारलें तर त्याला उत्तर काय ? एका देशाचें दुसऱ्या देशावर राज्य कां असा आपण प्रश्‍न पुढे मांडणार, पण त्यांनीं ' एका वर्गाचें दुसऱ्या वर्गावर साम्राज्य कां ' असा उलट प्रश्‍न भरसभेत जर विचारला तर या काळोखी लागलेल्या तोंडानें आपण काय सांगावें, अशी ब्रह्मवृंदांस मोठी पंचाईत पडली ? ही काळोखी धुवून टाकून उजळ माथ्याने आपल्यावरील इंग्रजी सत्ता काढून टाका असें मोकळ्या मनानें मांडतां यावें म्हणून आपल्या देशबांधवावर होत असलेला जुलूम काढून टाकण्यास आपली ना नाहीं असें भासविण्यासाठीं १९१७ सालीं राष्ट्रीय सभेतफ ब्रह्मवृन्दानें बहिष्कृतोञ्नतिपर ठराव पास करवून आपला कलंक धुवून टाकिला. तसेंच १९१८ सालीं अस्पृश्यतानिवारक परिषद्‌ भरवावयास लावून लो. टिळक व लो. नामदार खापर्डे या wer बहिष्कृतोन्रतीस ब्रह्मवृन्दाची सहानुभूति आहेसे वाचेने दर्शविले. चांभाराचा गणपति आपण गाडीत घेतला हा आपल्या सहानुभूतिचा पुरावा भरसभेत

डब्ल्यू-२०७३-३ अ