११
वेर्यांनीं की हो नेला कैवारी
एकाच परिस्थितीने गांजलेल्या माणसांनी एकमेकास दाखविलेल्या सहानुभूतीची उदाहरणें कोणास पाहिजे असल्यास त्यानें आपला अनुभव चोखाळून पहावा, परंतु एका देशांतील लोकांनी दुसऱ्या देशांतील समदुःखीयांना सहानुभूति दाखविल्याचीं उदाहरणें क्वचितच सांपडतात. भाषा, वर्ण, संस्कृतिभिन्नत्वामुळे देशादेशाचे निरनिराळे तट झालेले दिसतात. या त्रयीच्या कुंपणानें एक देश दुसऱ्या देशाला पारखा होतो. अशा भिन्नत्वामुळें एकाचे विचार दुसऱ्याला कळणें शक्य नसतें. संस्कृति व वर्णभिन्नत्वामुळें एका देशांतील लोकांचे दुसऱ्या देशांतील लोकांशीं दळणवळण कमी असतें. परिस्थितीचे अज्ञान व दळणवळणाचा अभाव यामुळें एका देशांतील लोकांस दुसऱ्या देशांतील लोकांबद्दल सहानुभूति उत्पन्न होण्यास जागाच नसते. परंतु एकुणिसाव्या शतकापासून या बाबतींत बराच
फरक पडला आहे, असें म्हणावें लागतें. परस्पर देशांत वस्लुविनिमयापासून
परभाषेचें ज्ञान होऊं लागलें व ॒ त्यापासून विचारविनिमयहि होऊं लागला. वर्तमानपत्रे, आगबोटी इत्यादी साधनांनीं सर्व जगाचें संघटन झालें आहे, आणि परिस्थिति कळूं लागल्यापासून परस्परांत सहानुभूति व सहकारिताहि उद्भूत होऊ लागली आहे. याचें मूर्तिमंत उदाहरण विलायतेंतील मजूरपक्षानें हिंदुस्थानास स्वराज्य मिळवून देण्यास केलेली मदत ही होय. स्वयंनिर्णयाचा मार्ग व्यवहारांत आणूं नयें असें म्हणणाऱ्या आपल्या जातभाईच्या मकरदाढेंतून तो काढून त्यानीं हिंदुस्थानसारख्या परदेशाच्या लोकांस ब्रिटिश साम्राज्यास संभवणाऱ्या धोक्याची दिक्कत न बाळगितां दिला. ही त्यांची करणी जरी त्यांच्या उच्च व धवल शीलास शोभण्यासारखीच आहे तरी तिचें आम्हास सखेदाश्चर्यच वाटत होतें. भांडवलवाल्यांच्या अतिलोभानें नागावलेल्या, दारिक्र्याने गांजलेल्या, नालायक म्हणून उपमरदिलेल्या या विलायतेंतील मजूरलोकांनीं हिंदुस्थानांतील वरिष्ठांच्या दंडलीनें पीडलेल्या, सामाजिक, आर्थिक, व धार्मिक जीवनास आंचवलेल्या, व नागरिकत्वास दुरावलेल्या, सर्व बाबतींत खालावलेल्या या समदुःखी बहिष्कृत लोकांना सहानुभूति दाखवावयाची ती एकीकडेच राहून ज्यांनीं त्यांचें नष्टचर्य केलें अशांना मदत केली याबद्दल कोणालाही हळहळच वाटणार आहे ; परंतु विलायतेंतील मजूरपक्षाच्या हातून जी ही अक्षम्य गोष्ट घडली तीस मजुरवर्ग जबाबदार नसून बहिष्कृत वर्गच जबाबदार आहें असें म्हणावें