३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लागतें. बहिष्कृत वर्गाने आपल्या खऱ्या दीन स्थितीचे ज्ञान व तिचीं कारणें मजूरवर्गास कळविण्याचा मुळींच प्रयत्न केला नाहीं. उलट वरिष्ठ हिंदूंच्या शिष्टमंडळाने बहिष्कृत वर्गांची स्थिति आबाद आहे, फार फार तर आर्थिक विषमता जशी इंग्लंडांत तशी हिंदुस्थानांतहि आहे असें भासवून जें कांहीं वाईट आहे तें इंग्रजाचा जुलुम, दुसरें वावगें कांहीं नाहीं असें सांगून मजूरवर्गाची सहानुभूति मिळविली, तरी पण फसून न जातां हिंदुस्थानांतील: आर्थिक दृष्ट्या नागावलेल्या लोकांची या बेगुमान लोकांस पर्वा करण्यास बजाविलें असावेंसें दिसतें. त्याशिवाय कांग्रेसनें गेल्या डिसेंबरांत मजूरसंघस्थापनेचा ठराव कां पास केला याचा उलगडा होत नाहीं. मजूरपक्षाची आज्ञा म्हणूनच तो पास केला गेला असावा. नाहीं तर आपल्या साऱ्या आयुष्यांत जिनें आंतरीय सामाजिक व आर्थिक गांजणुकीची चर्चा करून आपलें तोंड विटाळलें नाहीं तिनें गेल्याच वर्षी तसें विटाळावें याचें कारण काय ? विल्रायतेंतील मजूरपक्षानें या सोवळ्या सभेंकडून एवढें सत्कृत्य करवून घेतलें याबद्दल हिंदुस्थानांतील सर्व मजूरलोक त्यांचे निःसंशय आभार भानतील. परंतु हिंदुस्थानांतील सामाजिक विषमता आर्थिक विषमतेपेक्षा भिन्न असून अति तीव्र आहे, हें जर विलायतेंतील मजुरवर्गास योग्य कालीं समजावून दिलें असतें तर हें स्वराज्य म्हणजे आपल्यावर होणारें राज्य कदाचित् cael असते. निदान स्वराज्यांत स्वतंत्र प्रतिनिधिमार्फत आपलें राज्य करून आणण्यास त्यांनी गळ घेतली असती. पण या बहिष्कृत वर्गाच्या नादानपणामुळें त्यांचा कैवारी त्यांच्या वैऱ्यांनी नेला. इतःपर तरी असें न होईल अशी खबरदारी
घ्या.
विविध-विचार : मूकनायक, शनिवार, ता. २८ फेब्रुवारी १९२०.