१२.
स्वराज्यांतील आमचें आरोहण,
त्याचे प्रमाण व त्याची पद्धति
हिंदुस्थानांतील भावी स्वराज्य एकसत्तात्मक किंवा प्रजासत्तात्मक राज्य नसून प्रजा प्रतिनिधिसत्तात्मक राज्य होणार आहे, व अशा प्रकारचें स्वराज्य सुराज्य होण्यास मतदारीचा हक्क विस्तृत करून जातवार प्रतिनिधि देणें किती अगत्याचें आहे याचें विवेचन आतांपर्यंत लिहून गेलेल्या स्वराज्यावरील अग्रलेखांत केलें आहे. परंतु आमच्या वाट्यास येणारे प्रतिनिधि किती आहेत व ते कोणत्या पद्धतीनें मिळणार हें निश्चित झाल्याखेरीज जातवार प्रतिनिधीनुरूप होणाऱ्या आरोहणापासून आमचें कल्याण होईल असें मानून घेण्यास आम्हीं केव्हांहि तयार होणार नाहीं. म्हणून भावी स्वराज्यांत आमचे किती प्रतिनिधि असावेत व ते कोणत्या पद्धतीनें यावेत या प्रश्नाचा विचार या पंचम अंकी करूं
प्रथमतः जातीजातीत प्रतिनिधींच्या वाटणीचें योग्य प्रमाण कोणत्या आधाराने ठरवितां येईल हें पाहूं. जातवार प्रतिनिधि देण्याचें कारण मागें असें सांगितलें आहे कीं मतदार लोक प्रतिनिधि निवडून देतांना उमेदवारांच्या योग्यतेकडे विशेषसें लक्ष न पुरवितां त्यांच्या जातीकडे पाहून आपलें मत देतात. धर्मानें कांही जाति श्रेष्ठ व पवित्र ठरविल्या आहेत व कांही जाती कनिष्ठ व अपवित्र ठरविल्या आहेत. स्वाभिमानशून्य खालच्या जाति वरच्या जातीस पूज्य मानितात, ब शीलशून्य वरच्या जाति आपल्यास नम्रभावानें श्रेष्ठ मानणाऱ्या खालच्या जातीस नीच मानतात. अशा अन्योन्य भावनेने प्रेरित झालेल्या लोकांचे जर आपण सर्वसाधारण स्थलवाचक मतदार संघ केले तर अशा संघाचा प्रतिनिधि म्हणून निवडून जाण्यास उभा रहाणारा उमेदवार जर ब्राह्मणेतर किंवा बहिष्कृत असला तर वरच्या जातीचे मतदार ज्याला त्याच्या जातीमुळे नीच [मानीत ] [आहेत ] [त्याला ] आपलें मत देऊन प्रतिनिधिसारख्या उच्च दर्जास चढवून स्वतःची मानहानि [करून ] घेण्याइतका उदारपणा केव्हांच दर्शविणार नाहींत. उलटपक्षी तोच उमेदवार जर ब्राह्मण असला तर वर्णाभिमानानें एकजीव झालेले [ब्राह्मण ] [लोक ] [त्याला ] [मत ] देतील यात मुळींच शंका नाहीं. पण नवलाची गोष्ट ही आहे कीं, ब्राह्मणेतर व बहिष्कृत लोक देखील त्याला आपलें मत देऊन [ब्राह्मणाची ] [सेवा ] [करण्याची ] [आलेली ] ही संधी साधून पुण्यसंचय करण्यास [धांव ] [घेतील ] [हें ] [खास. ] इतकेच नव्हे तर