स्वराज्यांतील आमचें आरोहण, त्याचे प्रमाण व त्याची पद्धति - Page 83

स्वराज्यांतील आमचें आरोहण, त्याचें प्रमाण व त्याची पद्धति 3९

कोण्या जातीचे अधिक व कोण्या जातीचे कमी असें प्रतिनिधि घेण्यास कांही हरकत नव्हती. पण कायदे कौन्सिलातील प्रतिनिधि प्रेक्षणार्थ स्थानापन्न केलेल्या वस्तू नसून ज्यांचे ते प्रतिनिधी आहेत त्यांच्या परिस्थितींत अदलाबदल सुनावणारे सत्ताधीश पुरूष आहेत हें कोणी विसरतां कामा नये. असले सत्ताधीश पुरूष परिस्थितींत योग्यप्रकारचा अदलाबदल करतील किंवा नाहीं हें त्या सत्ताधीश पुरुषांच्या शिलावर व स्वभावावर अवलंबून आहे. सत्ता आली म्हणजे आपण स्वतंत्र झालों असा साधारण लोकांचा समज आहे. स्वराज्यवादी देखील आपल्या हातीं सत्ता येऊन आपण स्वतंत्र झालों म्हणजे वाटेल ती सामाजिक, धार्मिक व आर्थिक सुधारणा करूं असें सांगत फिरतात; परंतु हा समज अगदींच पोरकटपणाचा आहे. मनुष्य सत्ताधीश जरी झाला तरी तो स्वतंत्र नसतो. स्वभावाच्या आधीन असल्यामुळे स्वतंत्र असूनहि तो पारतंत्र्यात असतो. स्वभाव सांगेल त्या मार्गानें जाण्यास सत्तेमुळें तो स्वतंत्र आहे; पण स्वभावाच्या विरूद्ध जाण्यास सत्तावान्‌ माणूस देखील अगदीं दुर्बल आहे. म्हणून सत्तेचा उपयोग कोणत्या WH होईल हें सर्वस्वी सत्तावान्‌ पुरुषाच्या स्वभावावर अवलंबून रहाणार आहे. ब्राह्मणी स्वभाव ज्यांच्या आंगी बाणला आहे असें पुष्कळसे प्रतिनिधि जर कायदेकौन्सिलांत शिरले तर त्या वर्गाच्या सामाजिक व धार्मिक वर्चस्वामुळें होणारे इतर जातीचें नुकसान टाळण्यास ते आपल्या हातीं आलेली सत्ता खर्ची घालतील काय ! उलट हें वर्चस्व कायम करण्यास त्यांच्याकडून उपाय योजिले जातील असें अनुमान काढल्यास चुकींचे ठोणार नाहीं. हें वर्चस्व जर गेलें नाहीं तर स्वराज्य असून उपयोग काय ? व तें जर कायम झाले तर स्वराज्यासारखा दुसरा अधःपात कोणता ? स्वराज्याचे असे विपरीत परिणाम होऊं नयेत म्हणून ज्या जातींना आजची परिस्थिति जाचक हीत आहे त्यांच्या हातीं ती सानुकूल करून घेण्यास पुरेशी सत्ता येईल इतके प्रतिनिधि उर्फ सत्ताधीश पुरुष त्या त्या जातींतून आले तरच स्वराज्यापासून खरा फायदा होणार आहे. म्हणूनच जातींजातींत प्रतिनिधींची वाटणी कोणत्या तत्वावर व्हावी हा प्रश्‍न फार महत्त्वाचा आहे. या प्रश्नासंबंधी लॉर्ड मोर्ले यांचे मत मननीय आहे. १९०९ सालीं मुसलमानांना किती जातवार प्रतिनिधि द्यावेत या वादग्रस्त प्रश्‍नाचा निकाल लावतांना ते म्हणालें “ माझ्या मतें जातवार प्रतिनिधींच्या तत्त्वानुरूप कायदेकौन्सिलची रचना करितांना जातीजातींतील व्यवहार, त्यांच्या इच्छा, त्यांच्या गरजा इत्यादिकांत समतोलपणा ठेवला जाईल अशा रीतीनें

त्यांच्यांत प्रतिनिधींची वाटणी झाली पाहिजे. असा समतोलपणा गणितशास्त्राच्या,

भूमितीच्या किंवा तर्कशास्त्राच्या सिंद्धांतानें साध्य होणार नसून त्याला व्यापकबुद्धिचा

व दूरदृष्टीचाच उपयोग केला पाहिजे. माझ्या मतें प्रतिनिधींचे प्रमाण ठरवितांना