स्वराज्यांतील आमचें आरोहण, त्याचें प्रमाण व त्याची पद्धति ४१
प्रमाणानुसार वाढ करून आम्हांस नऊ प्रतिनिधि द्यावेत असें आमचें निकराचें सांगणें आहे. ज्याप्रमाणें प्रांतिक कायदे कौन्सिलांत आमचे प्रतिनिधि असले पाहिजेत त्याचप्रमाणे वरिष्ठ कायदेकौन्सिलांतहि आमचे प्रतिनिधी असले पाहिजेत. कारण ज्या कांहीं बाबींशी आमचा निकटसंबंध आहे, उदाहरणार्थ हिंदू कायदा व्यापारी पद्धति इत्यादि महत्त्वाच्या बाबी वरिष्ठ सरकारनें आपल्या ताब्यांत ठेविल्या आहेत. अशा बाबतींत प्रसंगोपात सुधारणा घडवून आणण्याइतके जरी नाहीं तरी सुधारणा सुचवावयास वरील नऊजणांनी निवडून दिलेला आमचा निदान एक तरी प्रतिनिधि असला पाहिजे.
येथवर प्रतिनिधीच्या विभागणीच्या प्रमाणाचा विचार झाला. आतां त्यांच्या आरोहणच्या पद्धतीचा विचार करू. कायदे कौन्सिलांत येणारे प्रतिनिधी सरकारच्या आवडीनें किंवा मतदारांच्या निवडीनें येऊ शकतात. या दोन पद्धतीपैकी दुसरी पद्धतीच श्रेष्ठ आहे असें अनुभवांतीं सिद्ध झालें आहे. निवडणुकीच्या पद्धतीनें मतदारांत जागृति होऊन त्यांना राजकीय शिक्षण प्राप्त होतें, व निवडलेला प्रतिनिधी त्यास निवडून देणाऱया मतदारांस जबाबदार राहतो. उलटपक्षीं आवड करुन नेमलेले प्रतिनिधी ज्यांचे ते प्रतिनिधी म्हणून नेमले जातात त्यांना जबाबदार रहात नसून जे लोक त्यांना नेमतात अशानाच जबाबदार रहातात. आवड करून नेमलेले प्रतिनिधी ज्यांचे ते प्रतिनिधी म्हणून असतात त्यांचा वेळीप्रसंगी द्रोह करण्यास मागेंपुढें पहात नाहींत. कारण कोन्सिलांत होणारा त्यांचा शिरकाव त्यांच्या अशीलांना खुशी राखण्यावर अवलंबून नसून सरकारची बहाल मर्जी राखण्यावरच अवलंबून असतो. सरकारी धोरण व लोकांच्या इच्छा यांची नेहमीच एक दिशा असते असें फारसें घडून येत नाही. परंतु ज्यांची जागा सरकारी धोरणास मान डोलविण्यावरच अवलंबून असते त्यांच्या हातून लोककार्य होण्याचा फारसा [संनव ] नसतो. शिवाय ज्यांचे प्रतिनिधी सरकार आवड करून [घेतें ] ते निवडणुकीच्या व्यापारापासून होणाऱ्या राजकीय शिक्षणास आंचवून हतभाग्याप्रमाणें निर्माल्यवत होतात. एकूण निवडणुकीच्या पद्धटीपासून दुहेरी फायदा आहे. पण ज्या अर्थी भावी कायदेकौन्सिलांत आमचे प्रतिनिधी सरकार आवड करून घेणार [आहे ] त्या अर्था आम्हांस राजकीय शिक्षण मिळणार नसून आमच्या [प्रतिनिधोंपासून ] आमचा फारसा हित संचय होईल अशी सबळ आशा [बाळगण्यास ] [आमचें ] [मन ] [धजत ]
नाहीं.
दरेक व्यक्तीस पूर्णावस्थेस येण्यास सामाजिक परिस्थिति कोणत्या प्रकारची पाहिजे हें ठरविण्याचा हक्क जेथें दरेक व्यक्तीस प्राप्त झाला आहे, अशा स्थितीस स्वराज्य हें नांव देणें यथार्थ होणार आहे. अशा प्रकारचें स्वराज्य या देशांत