अपराध कोणता ? द्वेष्ट्यांशीं सहकार्य - Page 87

१३
अपराध कोणता ? द्देष्ट्यांशी सहकार्य

आम्ही व्यवसायबंधुधर्मानुरूप आमचा मूकनायक मराठी भाषेंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व वर्तमानपत्रकारांना भेटीदाखल पाठवितो. परंतु नवलाची गोष्ट ही आहे की, उलटपक्षी आम्हास फक्त ब्राह्मणेतरांचींच पत्रे भेटीदाखल येतात. ब्राह्मणांच्या छायेखालीं असणारीं वृत्तपत्रे आम्हास भेटीदाखल येत नसल्यामुळे त्यांच्यांतून आमच्यावर कोणत्या प्रकारची टीका होते याबद्दल आम्ही नेहमीं अज्ञानदशेंत असतों. ता. २३-३-१९२० च्या ज्ञानप्रकाशांत मुकनायकांनें रा. शिंदे यांजवर केलेल्या टीकेस उत्तर आलें आहे. टीकेस प्रत्युत्तर न दिल्यानें टीकेंतील मुद्दे ज्यांच्यावर टीका केली जाते त्यांस मान्य आहेत असा वाचकांचा ग्रह होतो. व्यवसायबंधुभावानें प्रेरित होऊन जरी ज्ञानप्रकाश नित्यनेम आमच्याकडे आला नाहीं तरी आम्हास प्रत्युत्तर देण्यास सवड मिळावी म्हणून ज्ञानप्रकाशकारांनी निदान तेवढा अंक तरी आमच्याकडे पाठवावयाचा होता. पण सुदैवाने आमच्या

एका मित्रानें तो आमच्याकडे आणून दिल्यामुळे प्रत्युत्तर देण्याची जी ही संधी

आम्हांस मिळाली आहे त्याबद्दल आम्ही त्याचे फार आभारी आहों. आमच्या

टीकेस उत्तर देण्यास लो. शिंदेच समर्थ होते. ज्या अर्थी लो. शिंदे स्वतः उत्तर

देण्यास असमर्थ झाले आहेत त्या अर्थी ज्ञानप्रकाशकारांच्या उसन्या माहितीने

आमच्या आक्षेपाचे निरसन होईल असें ज्ञानप्रकाशकारांनी केव्हांच मानूं

नये. डिप्रेस्ड क्लास मिशन अस्पृश्यांत नीतीची व शिक्षणाची जागृति करण्यास

अस्तित्वांत आलें. या दोन्हीं दिशांनी या मिशनकडून अस्पृश्यांची किती उन्नती

झाली याबद्दल पुढें केव्हां तरी सविस्तरपणे लिहिण्याचा आमचा इरादा आहे.

राजकीय हक्कांसंबंधानें लो. शिंद्यांनी अस्पृश्यांचे किती कल्याण केलें

आहे याबद्दलचा समज ज्ञानप्रकाशकारांना देण्यापलिकडे आज कांहीं कर्तव्य

नाही. ना. कामत व सर शंकर नायर व wage कमिटी यांच्याकडून

अस्पृश्यांस जातवार प्रतिनिधि मिळवून देण्यास लो. शिंद्यांनी खटपट केली अशी

आमची कबुली आम्ही दिली असतांहि त्याची जाणीव आम्हास करून देण्याबद्दल

ज्ञानप्रकाशकारांनीं एवढा शीण कां घेतला हें आम्हास कळत नाहीं. लो. शिंद्यांनी

शीण घेऊन फायदा कां झाला नाहीं हें जर ज्ञानप्रकाशकारांनी शोधून पाहिलें असते

तर त्यांनीं जें लिहिलें तें त्यांना लिहावेसे वाटलेंच नसतें. लो. शिद्यांना जर

ज्ञानप्रकाशकार सांगतात एवढी अस्पृश्यांची कळकळ आहे आणि वरिष्ठ वर्ग त्यांची