अपराध कोणता ? द्वेष्ट्यांशीं सहकार्य - Page 88

४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पायमल्ली करितो असें जर त्यांना पूर्णपणें ठाऊक आहे तर त्या वरिष्ठ वर्गास स्वराज्य मिळाल्याने आपल्या आश्रितांची गळेचेपी होणार असें दिसत असूनहि त्यांनीं जातवारप्रतिनिधीचा झेंडा आधीं का रोविला नाही ? उलटपक्षी स्वराज्याच्या वादविवादांत जेव्हां जातवार प्रतिनिधीचा प्रश्‍न निघाला तेव्हां त्या तत्वाला विरोध करणाऱ्या पक्षांशी खांद्यासखांदा देऊन शिंदे कसे लढले हे ज्ञानप्रकाशकारांना श्रुत असेलच. एवढेंच करून ते गप बसले नाहींत. उलटपक्षी कौन्सिलांतील लोकप्रतिनिधींकडून अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून घेण्यांत यावेत अशा तत्वाचा त्यांनीं पुरस्कार केला. हें तत्व अस्पृश्यांची खरी कळकळ बाळगणाऱ्या गृहस्थास शोभतें कीं काय याचा विचार ज्ञानप्रकाशकारांनींच करावा. लो. शिंद्यांना तरी लाज वाटून हें तत्त्व आपलें नसून डि. क्ला. मिशनचें आहे असें ते म्हणूं लागलें. शिवस्य aad विष्णुर्विष्णुस्य हृदयं शिवः असा डि. क्ला. मिशनचा व शिंद्यांचा अन्योन्य संबंध अस॑तां वरील जें मत तें मिशनचें मत, माझें मत नव्हे असा कोटीक्रम लढऊन लो. शिंद्यांनी आपली नामोशी टाळली, व पुनः अस्पृश्यवर्गाकरितां जातवार प्रतिनिधी मिळावेत अशा मताचा पुरस्कार करण्यास ते पुढें सरसावले. ज्या गृहस्थाने जातवार प्रतिनिधीच्या तत्त्वाचा इतका पाडाव केला की, अस्पृश्यवर्गाला अपवाद म्हणून देखील ते लागू करण्यास सरकार किंवा शीलशून्य सुशिक्षित लोक कबूल होईनातसें झाले, त्याच गृहस्थाने जातवार प्रतिनिधी द्या अशी ज्यांचा त्या तत्वाविरूद्ध प्रबल आग्रह करून दिला होता त्याच गृहस्थाशीं मागणी करणें हें धोरण व हा विचारीपणा कींव करण्याजोगा नाहीं काय ? “ होता मंदिर दीप्तकूप खननी उद्योग तो कायसा “ असा हा खरा प्रकार असतांना जर ज्ञानप्रकाशकार त्याबद्दल शिंद्यांचा गौरव करूं इच्छितात तर करोत. अस्पृश्यांचे मन मात्र तितका गौरव करण्यास धजत नाहीं हा जो त्यांच्या आमच्यांत फरक आहे तो आम्ही प्रंजलपणें कबूल करितों. यांचें कारण हंद कीं, लो. शिंद्यांच्या करणीमुळें आम्ही जातवार प्रतिनिधीस आंचवलो असें आमचें मत आहे. प्रथमतःच जर त्यांनीं जातवार प्रतिनिधीस लोकमत अनुकूल करून घेण्यास प्रयत्न केले असते तर सर्वांना जरी नाहीं तरी अस्पृश्यांना तरी जातवार प्रतिनिधी मिळाले नसते काय ? तत्वाला मुठमाती दिल्यानंतर भिकारी लो. शिंदे त्याच तत्वाला जीवदान द्या म्हणून याचना करीत सुटले. व त्या भिकेत भर पडावी म्हणून ना. कामत व सर शंकर नायर यांच्यापुढें तोंड वेंगाडण्याची त्यांना पाळी आली. पणभिकेची हंडी शिंक्यास लागत नसते त्याप्रमाणे ती लागली नाही हें शिंद्यांना वाटो की न वाटो आम्हांस तरी दुर्दैव वाटतें. हें दुर्दैव शिंद्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ओढवलें असें ज्ञानप्रकाशकारांस वाटत नसेल तर न वाटो. आम्हांस तरी दुसरें कांहीं कारण असेलसें संभवत नाहीं. लो. शिंदे हें अस्पृश्यांची कळकळ बाळगित नाहींत