अपराध कोणता ? द्वेष्ट्यांशी सहकार्य ४५
असा आक्षेप कारण असतांहि त्यांच्यावर कोणा अस्पृश्यानें किंवा मूकनायकानेंहि केला नाहीं. त्यांच्या वर आम्ही केलेल्या टीकेस त्यांचे चुकीचे धोरणच कारणीभूत आहे. कळकळ असूनहि ज्यांचें धोरण चुकीचें असतें त्यांच्याहातून ज्यांचे कल्याण व्हावें अशी ज्यांची इच्छा असते त्यांचे अकल्याण झाल्याची उदाहरणे ज्ञानप्रकाशकारांच्या ऐकिवांत नसतील असें आम्हांस वाटत नाहीं. अशा उदाहरणापैकींच लो. शिंद्यांचे एक उदाहरण आहे असें म्हटल्यास ज्ञानप्रकाशकार हरकत घेतील तर त्याला आमचा नाइलाज आहे. ज्ञानप्रकाशकारांचा दुसरा असा कोटीक्रम आहे कीं अस्पृश्यवर्गानें वरिष्ठ वर्गाचा द्वेष केल्यास लो. शिंदे यांना तें उघड्या डोळ्याने पहावत नाहीं, व ते लो. टिळकांचे द्वेष्टे नाहींत म्हणूनच ना आम्ही त्यांच्यावर आपले हत्यार उपसलें आहे. *' समोंह सर्वभूतेषु नमे द्वेष्योस्ति न प्रिय : “ हें जरी ब्रह्मपणाचें किंवा देवपणाचें लक्षण आहे तरी मानवी दृष्टीने पहातां ज्यांनी आमचें नष्टचर्य केलें त्यांच्यावर आम्ही लोभ करीत नाहीं हें कबूल करण्यास आम्हांस कोणत्याच प्रकारची लाज वाटत जाही. लोभ, क्रोध, मोह, मत्सर इत्यादि वृत्ति ईश्वराच्या ठायीं असतात की नाहीं कोण जाणें ! परंतु मनुष्याच्या ठायीं त्या असतात व परिस्थितीनुसार त्या प्रबल होतात [किंवा ] शमतात हें खास. अस्पृश्यवर्ग देखील मनुष्य प्राण्याचाच वर्ग आहे व त्यांचा [द्वेष ] करणारांचा जर त्यांनी मत्सर केला तर त्यांच्या नीतिमत्तेची कोणी कींव करील तर ते लो. शिंदेच होत. याचें कारण लो. शिंदे हे देव झाले आहेंत, किंवा त्यांची दृष्टि ब्रह्ममय झाली आहे असें नाहीं. ते अस्पृश्येतर आहेत म्हणूनच ते द्वेष करीत नाहीत. द्वेष हा खऱ्या जळजळीचा उपशम आहे. लो. शिंदे जर अस्पृश्य असते तर त्यांच्यानें द्वेष केल्याशिवाय राहावलें नसतें. अस्पृश्यांना वाहून घेऊन ते स्वतः अस्पृश्यांपैकींच एक झाले आहेत असें [जें ] आजवर [वाटत ] [होतें ] [तें ] [चुकीचें ] आहे हें ज्ञानप्रकाशकारांनीं ध्वनित [केलें ] [हें ] [बरें ] [झालें. ] अस्पृश्यांची उन्नती करण्यास अस्पृश्य झाले पाहिजे यास कोणी [ना ] [म्हणणार ] [नाहीं. ] तरीपण शिंदे लो. टिळकांचे द्वेष्टे नाहींत म्हणून आम्हीं त्यांच्यावर [रागावलों ] [असा ] [जो ] ज्ञानप्रकाशकारांनी आपला समज [करून ] [घेतला ] [आहे ] [तो ] [चुकीचा ] [आहे. ] आमच्या रोषाचें मूळ कारण इतकेंच की, लो. टिळकासारख्या “ शठंप्रति शाठ्यम “ या तत्वाला जागणाऱ्या गृहस्थाशीं ते सहकारिता [करितात. ] द्वेष करणें व सहकारिता न करणें या दोहोंमधलें अंतर ज्ञानप्रकाशकारांना [कळणार ] [नाहीं ] [असें ] [नाहीं. ] आमचें एवढेच म्हणणें आहे कीं, जे लोक [आमच्याबद्दल ] सहानृभूति बाळगीत नाहीत, आमच्या उन्नतीच्या आड येतात, आमच्या [हक्कांची ] [पायमल्ली ] [करितात ] [अशा ] लोकांशी जे सहकार्य करितात [त्यांच्या ] [हातून ] [आमचा ] [तरणोपाय ] [होणें ] [तर ] [नाहीच ] पण आमची दिशाभूल मात्र होणार [आहे. ] या दिशाभुलीने लो. टिळक आमचें [कार्य ]