राष्ट्रांतील पक्ष - Page 95

१५
राष्ट्रांतील पक्ष

कोणतेहि सार्वजनिक कार्य झाले तर ते मी एकटा घडवून आणीन असे जर कोणी म्हणेल तर त्याच्या हातून कार्य तर होणार नाहीच पण समंजस लोक त्याच्या ऐटीबद्दल व अहंपणाच्या तोऱयाबद्दल त्याची कीव केल्याशिवाय रहाणार नाहीत. मनुष्याचे विचार कितीहि उदात्त असले तरी जर कां त्याला पाठबळ नसले तर तो पंगूवत्‌ होऊन त्याच्या विचाराचा अवतार कृतीत होणे कठीण जाते, व जोपर्यंत तसे झाले नाही तोपर्यंत उदात्त विचार असून नसून सारखेच म्हणावयाचे ; कारण विचारानुरुप जर जगाची रहाटी बदलली नाही तर मनुष्य मात्रास लाभ तो कोणता ? म्हणून कार्याच्या दृष्टीने पहाता कार्यशाली माणसांत एकदिली होऊन जूट होणे फार आवश्यक आहे. परंतु एकदिली उर्फ संयोग होण्यास सृष्टीतील निर्जीव वस्तूंत किंवा सजीव प्राण्यात समान धर्म असावा लागतो. . पाणी आणि तेल, पाषाण व काष्ट धातू आणि मृत्तिका यांच्यांत जसा संयोग होत नाही, तसा व्याघ्र व शेळी, मांजर आणि उंदीर, इंग्रज व फ्रेंच, जर्मन व अमेरिकन, इटालियन व ग्रीक, पार्शी व खिश्चियन, हिंदू व मुसलमान, ब्राह्मण

व ब्राह्मणेतर इत्यादिकांतहि संयोग होत नाही. “' समानशील व्यसनेषु सख्यम्‌ “

हा न्याय सर्वत्र सारखा लागू पडतो. जीत व जेते, स्वामी व सेवक, श्रीमंत व दरिद्री, यांच्यांत देखील सख्य दिसून येत नाही ते याच न्यायामुळें. इंग्रज व नेटिव्ह, जहाल व मवाळ इत्यादिकांत जो संयोग होत नाहीं यांचेहि कारण त्यांच्यातील असमान धर्म हेच होय. कोणत्या पक्षाशीं आम्ही संयोगी आहों याची चर्चा करण्याचा आमचा इरादा आहे. पणती चर्चा करण्यापूर्वी हल्लीं अस्तित्वांत असलेले पक्ष कसे उभारले गेले व त्यांचें शील काय आहे हें तपासून पाहिलें पाहिजे.

अनंतदशाचक्रांत भ्रमतां भ्रमतां इंग्रेजी सत्तेखालीं हा देश करा आला याचा इतिहास सांगण्याचें कारण नाहीं. पडते मुसलमान व चढते मराठे यांना नमवून इंग्रजांनीं आपली सत्ता कशी प्रस्थापित केली हैं सर्वश्रुत आहेच. एकच गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे, ती ही कीं, प्रजापक्ष म्हणून जी काहीं चीज आहे ती मात्र अगदीं नवीन असून इंग्रजी अमदानींतच तिची लाणवड झाली आहे. अनेक परचक्रे या देशावरून गेलीं. मुसलमानांनीं अनेक दिवसपर्यंत आपली सत्ता या देशावर गाजवून “ होतां मुसलमान कीं कापूं मान “ या द्वादश अक्षरी फर्मानानुरूप हिंदूधर्मांचें निशाण जी शेंडी त्या शेंडयांचा फन्ना फार केला. पोर्तुगीज लोकांनीं