राष्ट्रांतील पक्ष - Page 96

५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपलीं ठाणी बसविलीं, व अनेक लोक खिस्तानुयायी केले. डच आले, फ्रेंचांनी वसाहती केल्या, परंतु मराठ्यांनीं खाल्लेल्या उचलेखेरीज जिकडेतिकडे औदासिन्य ! wed चेतना म्हणुन काहीं नाहीं. येईनात बापडे, आमचे काय जातें ! अशा भावनेनें खिळून गेलेली प्रजा इंग्लिश लोकांच्या अमलासंबंधानें एवढें औदासिन्य दाखवित नाहीं हे नवल नव्हे काय ? मुसलमानी किंवा मराठी राज्यासारख्या बेजबाबदार राज्याविरुद्ध प्रजेने कधींहि तट उभारला नाहीं. तारतम्याने पहातां मुसलमानी किंवा मराठी अमदानीपेक्षा ब्रिटिश अमदानी कितीतरी सुखावह आहे. दरेक व्यक्तीला कितीतरी स्वातंत्र्य व कितीतरी सुख प्राप्त होत आहे. असें असूनहि प्रजेनें तिच्या विरुद्ध आपला पक्ष उभारावा ही तिची अघटीत करणी सहज उमगण्यासारखी नाहीं. ज्या हिंदीजनांत जें एकप्रकारचें स्थैर्य व जी तटस्थता दृष्टीस पडत होती व ज्या स्थैर्यास व तटस्थतेस जगांतील दुसऱ्या देशांत क्वचितच उपमा सांपडेल असें वाटत होतें व ज्या तटस्थतेबद्दल सर्व पाश्चात्य राष्ट्रांत त्याची प्रसिद्धी होती ती तटस्थता व तें स्थैर्य लोपून त्याचें पर्यवसान विलक्षण अशा चैतन्यांत व्हावें हा सृष्टीतील एक चमत्कार आहे असें म्हटल्यास अतिशयक्ति होणार नाहीं. परंतु हा चमत्कार घडून येण्यास ब्रिटिश अमदानीच कारणीभूत झाली असें म्हणावें लागतें. ब्रिटिश अमदानीपूर्वी प्रजेंत ऐक्यभाव न उत्पन्न होण्यास बरीच कारणें होतीं. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक भाषा इत्यादिकांमुळे प्रजा एकजीव होणें शक्य नव्हतें. तरीपण या प्रजाशकलांचें नियमन करणारी शक्ति उर्फ सरकार एकच असतें तर हिंदी प्रजा एकपट झाली असती हें खास. अमेरिकन संयुक्त संस्थानांतील लोकांत हिंदुस्थानाप्रमाणेंच भिन्न धर्म, भिन्न जाती व भिन्न भाषा आहेत. तरीपण अमेरिकन प्रजेंत ऐक्यभाव किती आहे हें नुकत्याच संपलेल्या युद्धावरून सिद्ध होत आहे. उलट युरोपांतील लोक एकधर्मीय असूनहि त्यांच्यात ऐक्याचा अभाव-नव्हे वैमनस्य-किती आहे हें नुकतेंच प्रत्ययास आलें आहे. युरोपाप्रमाणें हिंदुस्थानांतील प्रजेंत ऐक्यभाव उत्पन्न झाला नाहीं याचेंहि कारण हेंच कीं, ब्रिटिश अमदानीपूर्वी युरोपाप्रमाणें हिंदुस्थानांतहि एक सरकार नव्हते. एका सरकारखालीं असणारे

आपण नागरिक, एकाच कायद्यानें बांधले गेलेलो आपण प्रजाजन, एकाच

शासनपद्धतीच्या माऱयाखाली सुखदुःख अनुभविणारे आपण लोक इत्यादि भावना जागृत करून प्रजेस एकवट करण्यास एकछत्रीराज्यासारखें दुसरें महत्कारण नाहीं. हिंदी प्रजा एकवट होण्यास एकछत्री इंग्रजी अंमल जितक्या परीनें कारणीभूत झाला तितक्याच We इंग्रजी भाषेचा प्रचारहि कारणीभूत झाला आहे. इंग्रजी भाषेच्या प्रचारामुळे भिन्नभिन्न पांताच्या लोकांत विचारविनिमय व आचारविनिमय होऊन ऐक्यभावांत भर पडली आहे. अशा प्रकारें एकवट