राष्ट्रांतील पक्ष ५३
झालेल्या प्रजेत वसत असलेलें आनुवंशिक औदासिन्य, स्थैर्य व तटस्थता जाऊन त्याच्या ठायीं स्वहक्काची जाणीव उत्पन्न होण्यास इंग्रजी राजकीय इतिहासाचे परिशीलन फार कामीं पडलें. प्रजा ही मेंढरें व राजा हा मेंढपाळ अशा भावनेनुसार आपल्या चैतन्याच्या दोऱ्या जो येईल त्याच्या हातांत देऊन बेगुमानपणें वर्तत असलेली प्रजा राजापेक्षां प्रजा श्रेष्ठ व राजानें राज्य करावयाचें तें प्रजेच्या अनुरोधानें करावयाचें, सारांश प्रजा हीच राजा म्हणून तिच्या चैतन्याच्या दोऱ्या तिच्याच हातात असाव्या असें ठोकून सांगणारा प्रजापक्ष इंग्रजी इतिहासाच्या परिचयाशिवाय अन्य कारणांनीं उभा राहिला असें म्हणण्यास काहीं आधार दिसत नाहीं. आतां हा प्रजापक्ष बलवत्तर होण्यास काहीं इंग्रजी अधिकाऱ्यांची दोषारू.द अमदानी कारणीभूत झाली तो प्रश्न वेगळा,
प्रथमतः इंग्रजीराज्य सुराज्य व्हावें असा या प्रजापक्षाचा हेतु होता. पण कालांतराने सुराज्यापेक्षां स्वराज्य बरें असें या पक्षास वाटूं लागलें. हेतूंत फरक झाल्याबरोबर या प्रजापक्षाच्या दोन फळ्या पडल्यावर एकपक्ष निर्भेळ स्वराज्य मागूं लागला, व दुसरा पक्ष इंग्लंडवांचून आपल्यास गति नाहीं म्हणून इंग्रजी साम्राज्यांतर्गत स्वराज्य आपणास मिळालें म्हणजे बस्स असें म्हणूं लागला. निर्भेळ स्वराज्य मागणारांचा जहाल कंपू बनला. वसाम्राज्यांतर्गत स्वराज्य मागणाऱ्यांना त्यांनी मवाळ असें नाव दिलें. जहाल कपूनें निर्भेळ स्वराज्यप्राप्तीसाठीं इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यास अराजकपणा अनेक प्रयत्न करून फैलाविला ; पण तोंडघशी पडून आपला मोर्चा त्यांनीं वेळींच परतविला हें देशहिताच्या दृष्टीने त्यांनीं एक मोठें राष्ट्रकार्यच केलें असें आम्ही समजतों. जहालांत आणि मवाळांत जो एक फरक उरला आहे तो हाच कीं, जहालांच्या मतें हा देश स्वराज्यास पात्र आहे यास्तव पूर्ण स्वराज्य आम्हास आतांच द्या. मवाळांचें म्हणणें असें आहे, कीं हा देश स्वराज्यास सर्वस्वी पात्र नाहीं, यास्तव [स्वराज्याचा ] [एक ] [एक ] [ग्रास ] [पचेलसा ] धिम्या धिम्यानें घ्या. या विचारभिन्नत्वामुळे मिळालेला स्वराज्याचा [उप्ता ] जहालांना अगदीं टाकाऊ व पात्रतेच्या मानाने अगदी उपमर्दकारक असा [वाटतो, ] तोच हप्ता मवाळांना पुरेसा आहे असें वाटतें. या पक्षभेदांत आमचा पक्ष कोणता असें जर कोणी विचारलें तर या दोहोंपैकी आमचा एकही [पक्ष ] [नव्हे ] [असें ] [आम्हीं ] म्हणूं. जोपर्यंत इंग्रज लोक आम्ही राजे, आमच्या [पूर्वजांनीं ] [रक्त ] [वेचून ] [हा ] [देश ] काबीज केला तो आपल्या वंशजांनी [या ] [देशावर ] [जगावें ] [म्हणूनच ] [केला, ] राजकारणांत आमचें कल्याण हा प्रधान हेतु असून [साधल्यास ] [हिंदुस्थानचे ] कल्याण करावयाचें इत्यादि युक्तिवाद [लढऊन ] [प्रजापक्षाविरुद्ध ] [आपला ] [राजपक्ष ] मांडित असत तोपर्यंत जहाल आणि [मवाळ ] [या ] [पक्षभेदांत ] [काहीं ] [अर्थ ] [होता. ]