राष्ट्रांतील पक्ष - Page 98

uy डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्वराज्य मिळत नाहीं हा जोपर्यंत प्रश्‍न होता तोपर्यंत तें त्वरित मागा किंवा दमानें मागा असें म्हणणें प्रश्‍नास धरून होते. पण आतां स्वराज्य मागण्याचा प्रश्‍नच उरला नाहीं. मिळालेलें स्वराज्य कोणत्या तत्वानुसार वापरावें हा मुख्य प्रश्‍न आहे. अशा प्रकारें वस्तुस्थितीची घडी मोडली असल्यामुळें जहाल आणि मवाळ हा पक्षभेद सहाजिकपणें गचाळ वाटूं लागला आहे. स्वराज्य प्राप्त होण्यास आपण स्वराज्यास लायक आहों असें सिद्ध केलें पाहिजे असें जहाल मवाळाप्रमाणें सर्वांसच वाटतें. पण आपली पात्रता कशावरून सिद्ध होईल हाच लढ्याचा प्रश्‍न आहे. पूर्ण स्वराज्य मिळण्याचा पक्का निश्चय हिंदुस्थानने केल्याशिवाय हिंदुस्थानास पूर्ण स्वराज्य मिळणार नाहीं यात उभयपक्षाचें कसें एकमत आहे हें अमृतसरच्या राष्ट्रीय सभेंत किंवा सोलापूरच्या प्रांतिक परिषदेंत पास झालेल्या स्वराज्याच्या ठरावावरून दिसून येईल. पक्का निश्चय केल्याची खूण इंग्लंडच्या लोकांना व पार्लमेंटला कशी पटवावयाची ह्यांतच काय तो त्यांचा मतभेद आहे. जहालांना वाटते कीं, इंग्रजी अधिकाऱ्यांशीं सहकारिता केली तर त्यांचें मत यांना ग्राह्य आहे असें वाटून पूर्ण स्वराज्याचे हक्क आपल्यास देण्यास इंग्लंडचे लोक व पार्लमेंट सभा केव्हांहि तयार होणार नाहीं. उलट मवाळांच्या मतें इंग्रजी अंमलदारांशी सहकारितेनें वागल्यानें सर्वांत लवकर पूर्ण स्वराज्य मिळणार आहे. नोकरशाहीशीं हटयोग करून वा भक्तियोग करून स्वराज्यप्राप्ति होते इतके दुधखुळे जहाल मवाळांत भरले आहेत हें पाहून विद्वत्तेच्या बळावर देशाचे पुढारी म्हणून मिरवणाऱ्यांच्या विद्वत्तेची कीव केल्याखेरीज रहावत नाहीं. आमच्या मतें नोकरशाहीशीं सहकारिता करणें किंवा न करणें हा स्वराज्य प्राप्तीचा मार्ग नव्हे. जनतेशी सहकारिता करून दिलेलें स्वराज्य तिला जितक्या प्रमाणात सुखावह करून दिले जाणार आहे तितक्याच प्रमाणांत स्वराज्य प्राप्तीबद्दलची पात्रता ठरणार आहे असें आम्हास वाटतें.

“ देशाचा राज्यकारभार त्याच देशांतील लोकांच्या हातीं असणें ही राज्यपद्धति अन्वर्थक असून तिच्यांत कांहीं हंशील असतो. परंतु जेंथे एका देशाचा राज्यकारभार दुसऱ्या देशांतील लोक चालवितात त्या स्थितीला राज्य हें नांव देतां येत नाहीं. कारण एका देशांतील लोक दुसऱ्या देशांतील लोकांस आपल्या अमलाखाली ठेवतात ते केवळ आपल्या कल्याणासाठी, पैसे कमविण्यासाठी, किंवा आपला फायदा करून घेण्यासाठी माणसांचा कळपच म्हणून ठेवितात ” ह्या इंग्लिश राजकीय तत्ववेत्ता मिल्लच्या सुभाषिताची पोपटपंची जहाल मवाळ वेळीं अवेळीं करून अज्ञान जनास स्वराज्य मागण्यास उद्युक्त करितात. ज्या इंग्रजी राजकारणाच्या इतिहासावर जहाल मवाळांची एवढी भिस्त आहे त्याच