राष्ट्रांतील पक्ष ५५
इतिहासांतील एक गोष्ट सर्वांच्या फायद्यासाठीं येथें नमूद करणें अप्रासंगिक होणार नाहीं. जशी हिंदुस्थानांतील राजकीय सत्ता ब्रिटिश लोकांच्या हातीं आहे तशी अर्ध एकोणिसावें शतक लोटून जाई तोपर्यंत इग्लंडांतील राजकीय सत्ता
प्रजेच्या हातीं नसून राजाच्या हातीं होती. ती सत्ता काढून घेण्यास इंग्लंडांत जो प्रजापक्ष उभारला होता त्याचेहि व्हिग्ज व टोरीज असें दोन तट होते. हें दोन्ही पक्ष जरी राज्याची सत्ता मर्यादित करण्यास झटत होते असें जरी इतिहास प्रसिद्ध आहे तरी बहुजन समाजाचें या दोन पक्षांबद्दल काय मत होतें हें फारसें कोणाच्या ऐकिवात नाहीं. तें मत ज्यांना पूर्णपणें पहावयाचें असेल त्यांनीं प्रोफेसर mem वाँल्स यांनी लिहिलेल्या फ्रान्सिस प्लेस याच्या चरित्राचे परिशीलन करावें. इंग्लडांतील राजकारणांत धुमाकूळ माजवलेल्या वरील दोन पक्षासंबंधानें प्लेसनें एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, “ बहुजन समाजाच्या मतें fara आणि टोरिज या दोन पक्षांत कोणताच महत्वाचा भेद नाहीं. भेद आहे तो एवढाच कीं, टोरीपक्षाला राजाची सत्ता बळकट करून तिच्या जोरावर समाजांतील श्रेष्ठ व गरीब लोकांवर चरावयास पाहिजे. व्हिग्ज पक्षाला श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून राजाला व गरीब प्रजेला पायाखाली तुडवावयास पाहिजे. “ वरील मिमांसा जहाल व मवाळांना इतक्याच किंबहुना त्याच्याहिपेक्षा जास्त प्रमाणांत लागू पडते यात मुळीच संदेह नाहीं. कारण दोन्ही पक्ष जरी इंग्रजी सत्ता मर्यादित करण्यास [झटत ] [आहेत ] [तरी ] [जहालांना ] [श्रेष्ठ ] लोकांची सत्ता स्थापित करून इंग्रजांना व [गरीबांना ] [चेंगरावेसें ] [वाटत ] [आहे ] [व ] मवाळांना इंग्रजी सत्तेच्या आधारावर गोरगरिबांची [होत ] [असलेली ] [पायमल्ली ] [कायम ] करावयास पाहिजे. म्हणून स्वराज्याच्या उपयोगाच्या प्रश्नासंबंधानें [पहातां ] [हे ] दोन्ही पक्ष जितके गचाळ आहेत [तितकेच ] [जनहिताच्या ] [दृष्टीनें ] [विघातक ] आहेत. ज्यांना जनतेच्या हिताचा संचय [करावयाचा ] [आहे ] [त्यांना ] [ब्रिटिश ] [सत्तेचा ] अभाव म्हणजे स्वराज्य अशी [स्वराज्याची ] व्याख्या करून चालावयाचें नाहीं. व्यक्तीच्या उन्नतावस्थेस अनुरूप [अशी ] [सामाजिक ] [स्थिति ] [घडवून ] आणण्यास दिलेले [स्वातंत्र्य ] [हीच ] [स्वराज्याची ] [खरी ] [व्याख्या ] [आहे, ] [हे ] [मागील ] अग्रलेखांत ध्वनित केलें आहे. ही व्याख्या सार्थ होण्यास [कोणत्या ] [तत्वानुरूप ] समाजाची घटना झाली [पाहिजे ] [त्या ] [तत्वाचें ] [प्रतिपादन ] [पुढील ] [अंकीं ] [करूं. ] ही व्याख्या व हीं तत्वें [ज्यांना ] [मान्य ] [आहेत ] [त्यांचा ] [व ] [आमचा ] [एकच ] [पक्ष ] [आहे ] [हैं ] [निराळें ]
सागणें नको.
७७०७
त
त सतना न्य
अग्रलेख : मूकनायक, ता. १० एप्रिल १९२०.