१९
सकटांचा संघ
पुण्याचे रा. के. के. सकट यांनीं तेथें ' अस्पृश्य समाज समतासंघ ' नांवाची एक संस्था स्थापल्याचें ' भाला ' पत्रावरून कळतें. अस्पृश्यसमाजात महार, मांग, चांभार, ढोर, भंगी वगैरे ज्या अनेक जाती व पोटजाती आहेत त्या सर्व मोडून अस्पृश्यांमध्यें सरसहा रोटीबेटीव्यवहार सुरू करणें व. अस्पृश्यांत सामाजिक समता प्रस्थापित करणें हैं या संघांचें मुख्य ध्येय असल्याचें सकटांनीं जाहिर केलें आहे. रोटीबंद, बेटीबंद, लोटीबंद वगैरे अनेक बंद असलेल्या जातिभेदाचें समर्थन करणाऱ्या ' भाला ' पत्रांत ही बातमी प्रसिद्ध झाली आणि ' भाला ' कारांनीं सकटांच्या प्रयत्नांचे अभिनंदन करतांना आपल्या धोरणाप्रमाणें या सकटसमतासंघाचे भविष्यही वर्तवून ठेवलें! 'भाला' कार म्हणतात, अस्पृश्यांच्या सर्व जातींमध्यें बेटीव्यवहार होण्याची गोष्ट दूरच राहिली, परंतु नुसता रोटीव्यवहार व्हावयास कमीत कमी सात पिढ्या तरी जाव्या लागतील | ' भाला ' कारांचा हा शाप आहे कीं आशीर्वाद आहे हे सकटांनींच ठरवावें. त्यांना कळत नसल्यास आपल्या गुरुजीला विचारावें । सदरील भविष्य वर्तवितांना “भाला ' कारांची मनोवृत्ति कोणत्याही प्रकारची असो, आम्हांला तरी त्यांत त्यांची एक अप्रत्यक्ष कबुलीच दिसते. स्पृश्य वर्गातला जातिभेद कालात्रयीं नष्ट होणार नाही व होतां कामा नये, असें ' भाला ' काराचें मत आहे, परंतु अस्पृश्य हा वर्ग वेगळा राहिल्यावर त्यांच्यात रोटीबेटीव्यवहार होऊन तो एकजात बनला तर भालाकारांना. तें अनिष्ट नाही आणि स्पृश्यांतला जातिभेद. वजलेप असला तरी अस्पृश्यांतला जातिभेद सात पिढ्यानंतर कां होईना परंतु नष्ट होण्याचा संभव आहे असें त्यांना वाटते. म्हणजे भालाकाराची ब्राह्मण जात तेवढी अलग राहिली म्हणजे झालें आणि स्पृश्यवर्गीय लोक जातीभेदाला कायमचे चिकटून राहण्याइतके दुरभिमानी व अविचारी असले तरी अस्पृश्य वर्ग तसा दुरभिमानीं व अविचारी नाही.; आज ना उद्या तरी तो जातिभेदाच्या शुंखला साफ तोडून टाकणार, अशी त्यांच्याच कबुलीवरून भालाकाराची खात्री असावी असें दिसतें. पण भालाकार! जो महार किंवा चांभार जातीचा मनुष्य भंग्याला कमी लेखणार नाही तो ब्राह्मणादि जातींना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजेल काय ? सकटांना आता कांहीं ब्राह्मण लोक उचलून धरतील, किंबहुना सकटांच्या डोक्यांत त्याच लोकांनीं ही कल्पना घातली असेल. त्यांना पक्के ठाऊक आहे कीं, अस्पृश्य समाज अशिक्षित व अज्ञान