संकर्टाचा संघ - Page 101

५९ संकटांचा संघ

आहे. जातिमेदानें ग्रासलेला आहे. आधींच कित्येक दुरभिमानी लोकांनीं

फाटाफूट करण्याचा प्रयत्न चालविला बहिष्कृत वर्गामध्यें जातिभेदाच्या तत्त्वावर

म्हणजे अधिकच होतील आणि मग आहे, त्यांत सकटांचा हा संघ निघाला भांडणें

नाही, अस्पृश्यांना मोठ्या दिमाखानें विचारतां येईल कीं ' तुमच्यांतच जर समता तुम्हींच जर आपसांत एकमेकांना कमी समजतां तर आमच्यापाशी समतेचे हक्क तुम्हीं कोणत्या तोंडानें मागतां ? ' असा प्रश्‍न आजही मोठ्या साळसूदपणानें विचारण्यांत येतो. तोंच आणखी जोरानें विचारावयास मिळावे यासाठीच सकटांच्या डोक्यांत ही कल्पना भरविण्यात. आली असावी. अशी आमची समजूत आहे. ' अंदरकी बात ' कांहीं असो, सकटांचे हे समतापोषक प्रयत्न यशस्वी होवोत असेंच आम्हीं इच्छितो. बाकी, आतापर्यंतच्या त्यांच्या धोरणांवरून त्यांच्या संबंधानें आम्हाला भरंवसा वाटत नाहीं आणि अस्पृश्यांना आपसांतला जातिभेद नाहीसा करण्याच्या कामीं यश आलें तरी तेवढ्याने त्यांची अस्पृश्यता नष्ट होईल ही आशा अगदी व्यर्थ आहे. असेंही आम्ही स्पष्ट सांगून ठेवतो की, केवळ बुद्धिवादानें जर हा प्रश्‍न सुटण्यासारखा असता तर यापूर्वी केव्हांच तो सुटला असता. अरे तर PR म्हणण्याची, मनगटाला मनगट घासण्याची, अडवणुकीचे मार्ग स्वीकारण्याची, निरनिराळया सर्व बाजूंनीं शह देण्याची तयारी असल्यावांचून अस्पृश्यतेचे ग्रहण सुटण्याची आशाच करावयास नको.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.