२१
हिंदुधर्माला नोटीस |
दुसरीकडे, वऱ्हाडातील जळगांव व त्याच्या आसपासचे गाव येथील पांच हजार महार लोकांच्या तर्फे ' हिंदू धर्मास जाहीर आव्हान ' या मथळ्याखाली कांही पुढारी मंडळीच्या सह्यानिशीं जो मजकूर प्रसिद्ध करण्यांत येत आहे! तिकडे स्वत:ला हिंदु धर्मीय म्हणविणाऱ्या विशेषतः वरिष्ठ वर्णीय म्हणून स्वतःस समजणाऱ्या लोकांचें लक्ष जाईल अशी आम्हांस आशा आहे. हिंदू समाजांतील जातिभेदाला, उच्चनीचपणाच्या वर्गावर्गीला, स्पर्शास्पर्शाच्या निर्बधांना, उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या अन्यायाला व जुलुमाला, पदोपदी जाचक असणाऱ्या विषमतेला कंटाळून आतापर्यंत हजारों लाखों लोकांनी हिंदुधर्माला रामराम ठोकून परधर्मांचा अंगीकार केला आहे. ज्या मानानें बहुजनसमाजांत शिक्षणप्रगति होईल, विचार करण्याची प्रवृत्ति वाढेल, स्वाभिमानाची जागृति होईल त्या मानानें, 'अन्याय व विषमता यांच्या पायावर उभारलेल्या समाज रचनेसंबंधाचे असमाधान वाढावें, अन्यायाची चीड यावी, विषमतेनें संताप उत्पन्न व्हावा आणि जो धर्म व समाज आपल्या माणुसकीच्या हक्कांची पायमल्ली करतो, जो आपली माणुसकी काढून घ्यावयास पाहतो, त्या धर्माचा व त्या समाजाचा तिटकारा यावा, हैं अगदी स्वाभाविक आहे. एकादा अन्याय शतकानुशतके चालत आलेला असला, सत्तेच्या जोरावर तो खपवून गेलेला असला, लोकांच्या अज्ञानामुळे व बनावट धार्मिक समजुतीच्या दडपणामुळें त्याचा शतकानुशतके प्रतीकार झालेला नसला, तरी तो अन्यायच. त्या अन्यायाला धर्माची बेगड लावलेली असली म्हणून तो न्याय होईल असें नाही. आणि जेथें माणुसकीच्या हक्कांचा प्रश्न आहे तेथें चालू वहिवाटीचा प्रश्न पुढें आणून किंवा मुदतीच्या कायद्याकडे बोट दाखवून अन्यायाचे समर्थन करणें म्हणजे स्वतःच्या ठिकाणीं माणुसकीच नाहीं, माणुसकीच्या पवित्र हक्कांची आपल्याला जाणींव नाहीं, असें दाखंविणेंच. होय. ज्या वर्गाला हिंदुसमाजानें आतांपर्यंत लाथाळलें, जुलुमाच्या भाराखालीं चिरडलें, माणुसकीच्या हक्कांना आंचवावयास लावलें, ज्या वर्गाची भौतिकं ब मानसिक अवनति केली त्या
बहिष्कृत वर्गावर हिंदूसमाजाचा कांहींच हक्क नाही.
बहिष्कृत वर्गातले जे लोक अद्यापि हिंदुधर्माला चिकटून आहेत पे हिंदू समाजाविषयी त्यांना आपलेपणा वाटतो म्हणून नव्हे. हिंदुसमाजाविषयी
+ पाहा, परिशिष्ट क्रमांक : ५. ह
वाय ६४१-७