हिंदुधर्माला नोटीस ! ६३
हिंदुधर्मातल्या तत्त्वज्ञानाला पाश्चात्य देशांतले लोक सुद्धा माना डोलवितात. अशा प्राचीन व थोर धर्माला तुम्ही सोडूं नका, असा उपदेश स्पृश्य वर्गीय हिंदु
करितात. परंतु
तत्वज्ञान काय चाटावयांचें आहे ?
व्याकरणानें भूक थांबत नाहीं आणि काव्यरसानें तहान शमत नाहीं, अशा अर्थाची संस्कृत भाषेंत जी म्हण आहे ती धर्मातील तत्वज्ञानालाहि लागू आहे. धर्माची व्याख्या तरी कशी आहे ? 'यतोऽभ्युदयःनि श्रेयससिद्धि सधर्म' म्हणजे ज्याच्या योगानें अभ्युदय म्हणजे ऐहिक उत्कर्ष होतो व मोक्षप्राप्ति होते तो धर्म. म्हणजे ऐहिक उत्कर्ष प्रथम व मोक्ष नंतर असा क्रम आहे. बहिष्कृत वर्गावर अशा प्रकारचे सामाजिक निर्बध लादण्यांत आले आहेत की, त्या वर्गातील लोकांना आपलें डोकेंच वर काढता येऊं नये, त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यास व लायकी दाखविण्यास संधिच मिळूं नये, अस्पृश्यता याचा अर्थच असा आहे. उत्कर्ष बाजूलाच राहिला, परंतु साध्या सोप्या संवलतीहि अस्पृश्यतेमुळें मिळूं शकत नाहीत, त्यामुळें बहिष्कृत वर्गाला नानाप्रकारच्या विपत्ति व हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. अशा स्थितींत पारमार्थिक मुक्ति किंवा मोक्ष प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा असला काय व नसला काय सारखेच. मोक्ष पाहिला कोणी व कसा आहे ? या जगांत मोक्षासाठी धडण्डणारा व ऐहिक उत्कर्षावर लाथ मारणारा कोटींत एकादा. बाकीच्या सर्वांची ऐहिक उत्कर्षासाठी, ऐहिक सुखासाठी धडपड चाललेली असते. हिंदुधर्म हा फक्त मुमुक्षूंकरिता आहे, हिंदु समाजांत कोणी सुखाची अपेक्षा करतां कामा नये, असें ठरविलें तर जे उच्चवर्णीय म्हणविणारे लोक धर्माभिमानाच्या लंब्याचवड्या गप्पा मारतात, अस्पृश्यतेचे समर्थन करून बहिष्कृत वर्गाला स्वधर्मात राहण्याचा मोठ्या आढयतेनें उपदेश करतात, त्यातला एकसुद्धा इसम हिंदुधर्मात राहणार नाहीं, असें आम्ही खात्रीनें सांगू
शकतों. धर्माभिमान्यांचा वेदान्त
परदुःख शीतळ
या न्यायाचा आहे. उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांना विलायतेत जाऊन गोमांस खाऊन आलेले आपले जातभाई खपतात. एकादा मनुष्य विलायतेला जात असला किंवा जाऊन परत आला म्हणजे त्यानें अभक्ष्य भक्षण व अपेयपान केलें किंदा नाहीं याची चौकशी न करता आणि त्यानें तसें केलें आहे अशी मनाची बालंबाल खात्री असतांहि त्याला जातींच्या लोकांकडून निरोप देण्यांत येतो किंवा त्यांचे स्वागत करण्यांत येतें. एखादा अस्पृश्य मानलेल्या जातीचा इसम खिस्ती